Big Boss Marathi 5 canva
मनोरंजन बातम्या

Big Boss Marathi 5: आम्ही त्यांना कधीच माफ करणार नाही; पॅडीचा अपमान करणाऱ्या निक्कीला मराठी अभिनेत्याने सुनावलं

Big Boss Marathi Marathi Actors Reaction: बिग बॉस मराठीच्या नव्या प्रोमोमध्ये 'सत्याचा पंचनामा' खेळादरम्यान निक्की आणि जान्हवीने केलेल्या वक्तव्यामुळे दोघिंना भरपूर ट्रॉल करण्यात येत आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

बिग बॉस मराठीच्या नव्या सिझनला सुरुवात झाली असून पहिल्याचं दिवसापासून सदस्यांमध्ये राडा होत असल्याचं पाहायला मिळत आहे. बिग बॉसच्या घरात नुकताच 'सत्याचा पंचनामा' हा टास्क पार पडला. 'सत्याचा पंचनामा' या टास्कचे संचालन अभिजीतने केले होते. टास्कदरम्यान अभिजीतच्या बी टीमने त्यांची हुशारी दाखवल्यामुळे कोणालाही बीबी करन्सीचा लाभ घेता आला नाही. टास्कच्या आधी दोन्ही ग्रुप्समध्ये कडाक्याचं भांडण झाल्याच पाहायला मिळालं होतं.

बिग बॉसच्या घरातील 'सत्याचा पंचनामा' या टास्कमध्ये निक्कीच्या मतांशी असहमती दाखवल्यामुळे निक्कीला पंढरीनाथचा राग आला. तिने रागात पंढरीनाथला जोकर संबोधलं ''तुम्ही जोकर आहात'' असं निक्की म्हणाली. त्यानंतर जान्हवीने देखील पॅडिच्या अभिनयाच्या करियवर भाष्य करत त्याचा अपमान केला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होताना दिसतोय. व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे अनेक मराठी कलाकारांनी संतप्त आणि तीव्र प्रतिक्रिया दिलीय.

मराठमोळा अभिनेता आणि बिग बॉस मराठीच्या एक्स कंटेस्टंट अभिजीत केळकरने या व्हिडिओवर प्रतिक्रिया दिलीय. अभिजीतने एक व्हिडिओ शेअर करत त्याचे मत व्यक्त केलं आहे.

अभिजीत केळकरच्या पोस्टमध्ये नेमकं काय?

अभिजीतने पोस्ट केलेल्या पोस्टमध्ये म्हटला की '' होय, आमचा पॅडी 'जोकर'च आहे. कोणत्याही परिस्थितींमध्ये त्याच्या अभिनयाने चाहत्यांना हसवणारा आणि हसवताना डोळ्यात टचकन पाणी आणणारा आमचा हुकमाचा एक्का पॅडी आहे. आयुष्यातील अनेक प्रसंगामध्ये पॅडीने सर्वांची साथ दिलीय. त्यासोबतच आमच्या सर्वांच्या वाईट काळामध्ये आमची साथ देणारा आमचा एकमेव मित्र पॅडी आहे. बिग बॉसच्या घरामध्ये चांगल्या पद्धतीने खेळतोय.''

पुढे पोस्टमध्ये अभिजीत पुढे म्हणाला की '' आम्ही पॅडी तुझ्या फिनालेचे Finale चे व्हिडिओ बघतोय. तुला कोणीही काही बोलं तरी तू एकदम स्ट्ऱॉग पद्धतीनं खेळतोय. तू आणि वर्षाताईंनी जरी निक्की आणि जान्हवीला माफ केलेलं असलं तरी सुद्धा आम्ही त्यांना कधीच माफ करणार नाही. त्यादरम्यान अभिजीतच्या पोस्टवर नेटकऱ्यांनी देखील संताप व्यक्त केलाय.

Edited By: Nirmiti Rasal

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: धोरणात हिंदी, भाषणात मराठी, ठाकरे गटाचा दुटप्पीपणा जनतेला मान्य नाही - बावनकुळे

Sushil Kedia: काल म्हणाला मराठी बोलणार नाही, आज सुतासारखा सरळ झाला; सुशील केडीया म्हणाला मराठी फडाफडा बोलेल, पाहा VIDEO

Sai Tamhankar : बिनधास्त सईचा स्वॅग लय भारी, पाहा हटके PHOTOS

Vijay Melava: मी अनेक गोष्टी बोललो तर बोलायला जागा राहणार नाही; राज ठाकरेंच्या टीकेला दरेकरांचं प्रत्युत्तर

Marathi Bhasha Vijay: मनसेचा दणका! राज ठाकरे माझे हिरो आहेत – सुशील केडियाचा माफीनामा|VIDEO

SCROLL FOR NEXT