मनोरंजन बातम्या

Bigg Boss Marathi: 'बिग बॉस मराठी'च्या घरात अभिजीत बिचुकलेला राग अनावर; सदस्यांचा करणार पाणउतारा

Bigg Boss Marathi Day 63 : 'बिग बॉस मराठी'च्या नव्या प्रोमोमध्ये अभिजीत बिचुकलेची घरात एन्ट्री होताना पाहायला मिळत आहे.

Saam Tv

'बिग बॉस मराठी'च्या घरातील सदस्यांना आज चांगलाच धक्का मिळणार आहे. याआधी घरात कल्ला केलेल्या डॉ. अभिजीत बिचुकलेची आज 'बिग बॉस मराठी'च्या घरात एन्ट्री होणार आहे. अभिजीतच्या येण्याने आज घरात वाद, भांडणे, राडा, गोंधळ, ड्रामा असं सर्वकाही पाहायला मिळणार आहे.

'बिग बॉस मराठी'च्या नव्या प्रोमोमध्ये अभिजीत बिचुकलेची घरात एन्ट्री होताना पाहायला मिळत आहे. बिचुकले म्हणतोय,"डॉ. अभिजीत बिचुकलेका सादर नमस्कार". अभिजीतच्या एन्ट्रीला 'मैं हूँ डॉन" हे गाणं खास वाजवण्यात आलं आहे. 'बिग बॉस मराठी'च्या घरात अभिजीत बिचुकले पुन्हा एकदा त्याच्या स्टाईलने धुमाकूळ घालताना दिसून येईल.

'बिग बॉस मराठी'च्या समोर आलेल्या प्रोमोमध्ये अभिजीत बिचुकले सदस्यांचा पाणउतारा करताना दिसणार आहे. अंकिताची शाळा घेत बिचुकले म्हणतोय,"बहिण असं कधीच करत नाही, कुचकेपणा तुमचा दिसला. राग येतोय मला...मी काहीही फोडू शकतो या घरातलं".

बिग बॉस मराठीच्या घरात सुरुवाती पासूनच राडे, रडारड आणि घरातील सदस्यांची इमोश्नल साईड पाहायला मिळात आहे. तब्बल २ महिन्यांनतर घरातील सदस्य त्याच्या कुटुंबियांना भेटले त्यावेळी अनेक सदस्य धसाधसा रडू रागले. यंदाचा बिग बॉस मराठी १०० दिवसांचं नसून ७० दिवसांच आहे. बिग बॉस मराठी सिझन ५ चा ग्रॅंड फिनाले ६ ऑक्टोबरला पार पडेल.

Edited By: Nirmiti Rasal

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mithila Palkar: मिथिला पालकरचं वय वाढतय अन् सौंदर्यही खुलतय...

Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील सातही आरोपींची नावं समोर; कोकेन-गांजा, १० मोबईल अन् २ कार जप्त

Maharashtra Live News Update: नांदूर-मध्यमेश्वर धरणातून पाणी विसर्ग वाढवला

Anil Gote : भ्रष्टाचाऱ्यांसाठी जेल म्हणजे भाजप कार्यालय; माजी आमदार अनिल गोटेंचा सरकारवर हल्लाबोल

Weekly Horoscope: या आठवड्यात मोठे खर्च करण्याची तयारी ठेवा; वाचा साप्तहिक राशीभविष्य

SCROLL FOR NEXT