Akshay Kelkar Ganpati Sketch Video Instagram
मनोरंजन बातम्या

Akshay Kelkar Paint: अक्षय केळकरने रेखाटलं एक सुंदर चित्र, व्हिडीओ शेअर करत सांगितल्या भावना...

Akshay Kelkar Ganpati Sketch Video: अक्षय केळकरने चाहत्यांसोबत एक व्हिडीओ शेअर केली आहे.

Chetan Bodke

Akshay Kelkar Ganpati Sketch Video

‘बिग बॉस मराठी ४’ चा विजेता अक्षय केळकर नेहमीच सोशल मीडियावर कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. एक बहुआयामी अभिनेता म्हणून अक्षय केळकरची चाहत्यांमध्ये ओळख आहे. अक्षय केळकरने चाहत्यांसोबत एक व्हिडीओ शेअर केली आहे. या शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये त्याने चाहत्यांसोबत एक सुंदर गणपती बाप्पाचं चित्र रेखाटलं आहे. त्याने स्वत: रेखाटलेल्या या चित्राची सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चा होत आहे.

अभिनेता आपल्या पोस्टमध्ये म्हणतो, “आयुष्यात बाप्पाने मला खूप काही दिलं… सुरुवातीला, लहानपणी, चित्र म्हंटलं की मी कायम बाप्पाचं चित्र काढायचो…. after lockdown मी पुन्हा चित्रं काढायला सुरवात केली…माझ्या सगळ्या आवडत्या देवांची मी चित्र काढली आणि बाकीही बऱ्याच कॉन्सेप्टची सतत चित्र काढली होतीच… पण जो मला लहानपणापासून सगळं काही देत आला, मोठं झाल्यावर मी त्याचं चित्र काढलंच नाही… आणि आज हे पूर्ण केलंय! आणि पोटात खूsssssप मोठा गोळा आलाय… बाप्पाच्या पोटा पेक्षाही खूप मोठा… कारण… माझ्या आयुष्यातली सगळ्यात मोठी गोष्ट घडणारे… आणि ती ही त्यानेच दिलीय…”

पुढे आपल्या पोस्टमध्ये अभिनेता म्हणतो, “आता हे चित्र आयुष्यभर अशा ठिकाणी राहणारे जिकडे मी आतापर्यंत बरंच काही पाहिलंय… पण आता मात्र मी तिथे नसेन… बाप्पा मी तिथून जाणार आहे आणि तू तिथे असशील… ते माझं होतं… कदाचित या साठी माझ्या हातून इतकी वर्ष तुला घडायचं नव्हतं का रे ??? तू मला आता जे काही दिलंयस ना ते खूप आहे…. काळजी घे तुझी … आणि आता तू जिथे असणार आहेस तिथल्या लोकांची आणि माझीही आणि माझ्या लोकांचीही… तुझा अक्षय”, असे अक्षय केळकरने म्हटले आहे.”

अक्षय केळकरने शेअर केलेल्या या व्हिडीओवर फक्त चाहत्यांनीच नाही तर अनेक सेलिब्रिटी मित्रांनीही त्याच्या पेंटिंगचे कौतुक केले. अक्षयच्या या व्हिडीओवर अभिनेत्री सुकन्या मोने म्हणाल्या, “कित्ती दिवसांनी चित्र काढलं आहेस रे… फार सुंदर... गणपती बाप्पा मोरया!” अशी कमेंट केली आहे. तर समृद्धी केळकरने “अक्ष्या” म्हणत त्याचे कौतुक केले. त्यासोबतच अभिनेत्री अपूर्वा नेमळेकरने “वॉव, एकदम भारी भावा”, असं म्हणत त्याच्या पेंटिंगचे कौतुक केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Eknath Shinde : 'जय गुजरात'च्या घोषणेनंतर एकनाथ शिंदेंचं स्पष्टीकरण, उद्धव ठाकरेंचा VIDEO दाखवत विरोधकांना प्रत्युत्तर

DR. MC Dawar Death : आधी २ रुपये, आता २० रुपयांमध्ये करायचे उपचार; गरीबांचे डॉक्टर पद्मश्री एमली डावर काळाच्या पडद्याआड

Maharashtra Politics: सुषमा अंधारे अन् कुणाल कामराच्या अडचणीत वाढ; विधिमंडळात हक्कभंग प्रस्ताव मंजूर

Maharashtra Live News Update: वाल्मीक कराडची पोलखोल करणाऱ्या विजयसिंह बांगर यांनी घेतली अप्पर पोलीस अधीक्षकांची भेट

Auto Rickshaw Bag : बाजारात आलीये नवीन ऑटो रिक्षा बॅग, फॅशनचा नवा ट्रेंड

SCROLL FOR NEXT