Bigg Boss Marathi 4 Contestant Saam Tv
मनोरंजन बातम्या

Bigg Boss Marathi 4: दोन वाईल्ड कार्ड सह एका स्पर्धकाची बिग बॉसच्या घरातून एक्झिट, घरात नवे ट्विस्ट येणार

गेल्या आठवड्यात वाईल्ड कार्डच्या रुपात आलेल्या स्पर्धकांना आणि एका स्पर्धकाला बिग बॉसच्या घरातून बाहेर जावे लागले.

Chetan Bodke

Bigg Boss Marathi 4: बिग बॉस मराठी चौथ्या सीझनमधील खेळ बराच रंजक झाला आहे. सर्व स्पर्धकांना खेळात आता बऱ्यापैकी रस आलेला दिसून येत आहे. वाईल्ड कार्डच्या रुपात आलेल्या स्पर्धकांनी घरात चांगलाच धुमाकूळ घातला. सध्या बिग बॉस मराठीच्या घरातील सर्व स्पर्धक जवळपास 60 दिवसांपासून एकत्र खेळत आहेत. यापूर्वी कधीही न आलेला ट्विस्ट सर्वांना सध्या अनुभवायला मिळत आहे.

बिग बॉसच्या चावडीवर काल मांजरेकरांनी सर्व स्पर्धकांची नवी खेळी समजून घेतली. कारण गेल्या आठवड्यात बिग बॉसच्या घरात एकत्र चार वाईल्ड कार्ड स्पर्धकांची एन्ट्री झाली. घरातील सर्वच स्पर्धकांची खेळण्याची पद्धत बऱ्यापैकी बदलली असून कोणामुळे आपला खेळ बदलायचा नाही असा मानस जुन्या स्पर्धकांचा होता.

एवढे सर्व स्पर्धक एकत्र खेळल्यानंतर काल कधी ही न येणारी वेळ आली. ती वेळ म्हणजे एक स्पर्धक घराबाहेर जाण्याची. काल बिग बॉसच्या घरातून एक स्पर्धक आणि दोन वाईल्ड कार्ड स्पर्धक घराबाहेर गेले. ज्या वाईल्ड कार्ड स्पर्धकांनी घरात आल्या आल्या आपली पावर दाखवली तेच स्पर्धक घराबाहेर गेले आहेत.

काल घरातून डॉ. रोहित शिंदे आणि वाईल्ड कार्ड स्पर्धक मीरा जगन्नाथ आणि विशाल निकम हे घराच्या बाहेर गेले आहेत. रोहितच्या जाण्याने बऱ्याच जणांना मोठा आश्चर्याचा धक्का बसला आहे. काही दिवसांपूर्वीच रोहितची गर्लफ्रेंड रूचिराही घराबाहेर गेली होती. त्यामुळे बरीच चर्चा रंगली होती.

कालच्या भागाची सुरवात ‘भ्रमाचा भोपळा’ या खेळाने झाली होती. यात वाईल्ड कार्डच्या रूपाने आलेल्या स्पर्धकांनी इतर स्पर्धकांवर आपले मत मांडून त्यांच्या डोक्यावर भ्रमाचा भोपळा फोडला. जेव्हा स्पर्धकांना घरातून बाहेर पडण्याची वेळ आली तेव्हा मांजरेकरांनी विशाल निकम आणि मीरा जगन्नाथ यांची नाव घेतली. यामागील मांजरेकरांनी कारण सांगितले की, हे दोन स्पर्धक फक्त एका आठवड्यासाठीच आले होते. त्यामुळे त्यांच्या जाण्यानंतर पुढील खेळात काय नवा बदल होणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune crime news: पुण्यात रक्तरंजित थरार! बायकोशी अफेअर असल्याचा संशय; नवऱ्याने तरुणाला क्रूरपणे संपवलं

Crime: हात-पाय बांधले, तोंडात कापड कोंबलं; नंतर महिलेला जागीच संपवलं, गावात उडाली खळबळ

लाडक्या बहिणीचे पैसे मिळाले नाही, महिलांची e-KYC करण्यासाठी एकच झुंबड; अधिकाऱ्यांनी दिली महत्वाची माहिती

Maharashtra News Live Update: चालत्या कारमध्ये तरुणीवर बलात्कार, आरोपी फरार; कोरेगाव पार्क पोलिसांची शोधमोहीम सुरू

Weight Loss: जिम न करता ३ महिन्यात करा वजन कमी रोज फॉलो करा ही ट्रिक

SCROLL FOR NEXT