Bigg Boss Marathi
Bigg Boss Marathi Saam Tv
मनोरंजन बातम्या

Bigg Boss Marathi 4: बिग बॉस मराठीच्या घरात आक्रस्ताळेपणाची मर्यादा ओलांडली, काय घडलं नेमकं?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Bigg Boss Marthi 4 Update: 'बिग बॉस मराठी सीझन ४'ची ची रंगत दिवसेंदिवस वाढत आहे. स्पर्धकांमध्ये वादविवाद हे रोजच होत असतात. परंतु आजचा दिवस स्पर्धकांसाठी महत्वाचा आहे. कारण आज घरामध्ये कॅप्टन निवडला जाणार आहे. कॅप्टन्सी टास्क दरम्यान पुन्हा अमृता धोंगडे आणि अपूर्वा नेमळेकर यांच्यामध्ये वाद झाला.

'बिग बॉस मराठी'च्या या आठवड्याची सुरुवात ही सीझनच्या सर्वांत मोठ्या टास्कने झाली. 'खुल्ला करायचा राडा' असे या टास्कचे नाव होते. या टास्कमध्ये दोन्ही टीमच्या स्पर्धकांनी खूप राडा केला. मिरचीचा धूर, थंड-गरम पाणी, खोचक बोलणी जे शक्य होईल त्या सर्वाचा स्पर्धकांनी वापर केला. या भागात बाजी मारली ती किरण माने आणि विकास सावंतने. या सगळ्या गोष्टी त्यांनी बराच वेळ सहन केल्या आणि त्यांची टीम हा टास्क जिंकली.

आता घरामध्ये लढत होत आहे ती या आठवड्यातील कॅप्टन्सीसाठी. घरातील पहिली कॅप्टन समृद्धी जाधव, दुसरी कॅप्टन अपूर्वा नेमळेकर झाली होती. या आठवड्यात अक्षय केळकर कॅप्टन होता. आता येणाऱ्या आठवड्यात कोण कॅप्टन होईल याची उत्सुकता 'बिग बॉस'च्या प्रेक्षकांना आहे. (Bigg Boss Marathi)

कलर्स मराठीच्या सोशल मीडियावर नुकताच एक प्रोमो शेअर करण्यात आला आहे. त्यामध्ये कॅप्टन्सी टास्कची चुरस पाहायला मिळत आहे. तर ज्या स्पर्धकाचा फुगा फुटणार तो स्पर्धक कॅप्टन पदाच्या शर्यतीतून बाद होणार आहे. प्रोमोमध्ये यशश्री अपूर्वाच्या सांगण्यावरून अमृता धोंगडेचा फुगा फोडताना दिसत आहे. यावरून अमृता धोंगडे, अपूर्वा आणि यशश्री यांच्यात प्रचंड वाद होतात. (Social Media)

यशश्री 'बिग बॉस'ना सांगते, 'मी अमृता धोंगडे हिला बाद करू इच्छिते'. यावर अपूर्वा नेमळेकर अमृता धोंगडेला म्हणते, 'तू खेळलीस ते आक्रस्त होतं. अमृता धोंगडे यावर अपूर्वाला उत्तर देत म्हणते, तू काय कमी आक्रस्त होतीस? बोलणार... मला काढलंस ना बाहेर मला वाटेल ते बोलणार....' (TV)

यांचा हा वाद कॅप्टन्सी कार्यात कोणते अडथळे आणणार? कोण होणार या कॅप्टन्सी पदाच्या शर्यतीतून बाहेर? हे आपल्याला आजच्या भागात पाहायला मिळणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: ठाकरे-शिंदे लोकसभेनंतर एकत्र येणार, प्रकाश आंबेडकरांचा मोठा दावा

Special Report : Ravindra Dhangekar | 'धंगेकर पॅटर्न' की मतदारांचं 'मोहोळ'?

Special Report : Prakash Ambedkar | 'ठाकरे-शिंदे लोकसभेनंतर एकत्र येणार' आंबेडकरांचा मोठा दावा

Special Report : Praful Patel | पटेलांना जिरेटोप भोवला, टीकेची झोड उठल्यानंतर पटेलांची माघार

Special Report : Raj Thackeray | राज ठाकरे आणि नरेंद्र मोदी एकाच मंचावर?

SCROLL FOR NEXT