Kiran Mane On Big Boss: ‘बिग बॉस मराठी ४’ फेम किरण माने सोशल मीडियावर कमालीचा सक्रिय असतो. त्याने आपल्या उत्तम अभिनयामुळे प्रेक्षकांमध्ये स्वत:चे स्थान निर्माण केले. गावरान भाषा, मराठी भाषेचा खास लहेजा यामुळे किरण मानेचा चाहतावर्ग फक्त खेड्यातच नाही शहरात देखील आहे. ‘बिग बॉस मराठी ४’मधून ‘सातारचा बच्चन’नावाने प्रसिद्ध झालेला किरण माने पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. यावेळी तो ‘बिग बॉस मराठी’मुळे चर्चेत आला असून त्याच्या एका मुलाखतीची सोशल मीडियावर कमालीची चर्चा सुरू झाली आहे.
‘मुलगी झाली हो’या मालिकेत किरण मानेने विलास नावाचे पात्र साकारले होते. त्याला त्या मालिकेतून काढल्यानंतर ‘बिग बॉस मराठी’मध्ये झळकला अन् सर्वांनाच आपला इंगा दाखवत टॉप ५ मध्ये स्वत:ला सिद्ध केलं. बिग बॉसच्या घरात आपली खेळी यशस्वी करून स्वत:ला सिद्ध केलं. आणि अख्खा खेळच पालटला. बिग बॉस खरंच स्क्रिप्टेड असतं का असा प्रश्न अनेकदा प्रेक्षकांना पडतो. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत किरणने प्रेक्षकांच्या या प्रश्नाचं उत्तर दिलंय. आणि मुख्य बाब म्हणजे, या मुलाखतीत किरणने बिग बॉसमध्ये का गेलो याबद्दल आपले मत दिले. (Latest Entertainment News)
सौमित्र पोटेचं ‘मित्र म्हणे’या पॉडकास्टमध्ये किरणने अनेक प्रश्नांवर दिलखुलास उत्तर दिलंय. किरण म्हणतो, ‘मी आधीपासून बिग बॉस बघायचो. यात एकमेकांवर आरोप- प्रत्यारोप करतात. मला नेहमीच प्रश्न पडायचा की, हे खरंच असेल का? मला पैशाची गरज तर होतीच. पण मी काय गावी शेती करूनही स्वतःचा उदरनिर्वाह करू शकलो असतो. मात्र मला स्वतःला पारखूनही पाहायचं होतं. जसं अनेक लोक म्हणतात तसं मी खरंच वागतोय का, मी खरंच स्वतःला दीड शहाणा समजतोय का?, मी माणूस म्हणून खोटं वागतोय का?, मी उगाचच उद्धटपणा करतोय का? याची उत्तरं मला तिथेच गेल्यावर मिळणार होती. तिथे गेल्यावर लगेचच त्यांचे ग्रुप झाले. मी तीन आठवडे तरी एकटा पडलो.’
पुढे बिग बॉस स्क्रिप्टेड असतं का असं विचारल्यावर किरण म्हणतो, ‘अजिबात नाही. शक्यच नाहीये ते. मालिकांसाठी चॅनेलचे, प्रोडक्शन हाऊसचा माणूस, लेखक अशा लोकांची मिटिंग होते आणि मग आठवड्याभराचे एपिसोड ठरतात. इथे ते करणं मुळीच शक्य नाहीये.’
त्यानंतर किरण माने म्हणतो, 'बिग बॉसच्या घरात काय सगळे फार पोहोचलेले कलाकार नसतात, जे हातात स्क्रिप्ट आली की चला सुरू करा. हे जमणं शक्यच नाहीये. बिग बॉस मुळीच स्क्रिप्टेड नसतं. तिथे जी भांडणं होतात तीही खरी असतात. प्रत्येक जण आपापला गेम खेळत असतो.’
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.