Kiran Mane On Jawan Film Instagram
मनोरंजन बातम्या

Kiran Mane On Jawan Film: ‘साध्या गोष्टीचंबी सोनं करतोस तू...’; किरण मानेने शाहरुखच्या ‘जवान’ चं तोंडभरुन केलं कौतुक

Kiran Mane Special Post: चित्रपट प्रदर्शनानंतर किरण मानेंनी आणखी एक पोस्ट शेअर केली आहे, त्या पोस्टमध्ये अभिनेत्याने शाहरुखचं भरभरुन कौतुक केलं.

Chetan Bodke

Kiran Mane On Jawan Film

सध्या सोशल मीडियावर ॲटली कुमार दिग्दर्शित ‘जवान’ची प्रचंड चर्चा सुरू आहे. चित्रपटाने पहिल्या तीन दिवसात २०० कोटींचा टप्पा पार चित्रपटाचे सर्वत्र कौतुक होत आहे. चित्रपटाचं सर्वत्र कौतुक होत असताना फक्त बॉलिवूड सेलिब्रिटीच नाही तर मराठी सेलिब्रिटीही चित्रपटांचं कौतुक करीत आहेत.

गेल्या काही दिवसांपूर्वी ‘बिग बॉस मराठी ४’मुळे सर्वाधिक प्रकाशझोतात आलेल्या आणि सोशल मीडियावर ‘सातारचा बच्चन’ म्हणून चर्चेत आलेल्या किरण मानेंनी अभिनेता शाहरुख खानचं कौतुक केलं होतं. चित्रपट प्रदर्शनानंतर किरण मानेंनी आणखी एक पोस्ट शेअर केली आहे, त्या पोस्टमध्ये अभिनेत्याने शाहरुखचं भरभरुन कौतुक केलं.

गेल्या काही दिवसांपूर्वी किरण मानेंनी किंग खानच्या एकंदरीतच अभिनयाबद्दल आणि त्याच्यावर आलेल्या संकटांवर त्याने भाष्य केलं होतं. त्याने कशाप्रकारे सर्व संकटांना सामोरा गेला, याबद्दल त्याचं कौतुक केलं होतं. आता त्याच आवडत्या अभिनेत्याचा चित्रपट पाहण्यासाठी किरण माने आतुरलेले आहेत. किरण मानेंनी पण त्यांना चित्रपट पाहण्यासाठी मुहूर्त लागत नाही असं म्हणाले होते. त्यांनी किंग खानच्या शेअर केलेल्या पोस्टवर त्यांना कशाप्रकारे प्रतिसाद मिळतोय, यावर त्यांनी एक खास पोस्ट शेअर केली आहे.

किरण माने आपल्या पोस्टमध्ये म्हणाले, “आग्गाग्ग्गगागा... एक लाखाच्या वर लाईक्स... पाचशेच्या वर कमेन्टस्... दोन हजाराच्या वर शेअर्स... आणि तब्बल एक मिलीयन, म्हणजे दहा लाखाच्या वर व्हियूज ! अजूनबी सुरुच आहे. ते ही माझ्या फेसबुक पोस्टवर !! इन्स्टा-युट्यूबवर नव्हे. नादखुळाच !!! ...आजपर्यन्त माझ्या कुठल्याही पोस्टचे लाईक्स मी मोजले नाहीत. हो, पण कोण लाईक करतंय आणि कमेन्टस् काय येताहेत हे मात्र आवर्जुन पहातो, यातून समविचारी लोक कळतात, जवळ येतात. विषारी घाण दूर जाते. नको असलेला कचरा बाहेर जाऊन महाराष्ट्रभरात माझा मित्रमेळा पसरला तो यामुळेच... चाहते, प्रेम करणारी माणसं माझ्याशी संवाद साधू लागली.”

आपल्या पोस्टमध्ये पुढे किरण माने म्हणतात, “आयुष्य बहरून गेलं. काही जणांच्या दृष्टीनं हे 'आभासी जग' असो, मला मात्र यातून जिवंत, रसरशीत, हाडामासांचा, जीवाला जीव देणारा गोतावळा लाभला. माझ्यावर वाईट वेळ आली होती, तेव्हा अख्ख्या सोशल मिडीयानं आवाज उठवून भल्याभल्यांची हवा टाईट केलीवती, ती उगाच नाय. कालपासून मात्र माझ्या फेसबुक अकाऊंटवर छप्परतोड, आजपर्यन्तचा रेकाॅर्डब्रेक कहर झालाय ! मी 'जवान'च्या स्क्रीनिंगच्या वेळचा एक व्हिडीओ शेअर केला, त्याला फक्त महाराष्ट्रातूनच नव्हे, देशभरातून नव्हे, आशियातून नव्हे, तर जगभरातून प्रचंड रिस्पाॅन्स मिळाला..”

पोस्टच्या शेवटच्या भागात किरण माने म्हणतात, “श्रीलंका, बांग्लादेश, इंडोनेशिया, मलेशिया, पाकिस्तान, नेपाळ, साऊथ कोरीया, दुबई, म्यानमार, सौदी अरेबीया, इंग्लंड, अमेरीका, बल्गेरीया वगैरे वगैरे देशांमधले लोक माझ्या पोस्टवर आले. वर आकडे दिलेले आहेत. ते वाढतच चाल्लेत, 'जवान'च्या करीश्म्यासारखे. शारख्या, भावा तुझा स्पर्श ह्यो परीसाचा स्पर्श हाय... साध्या गोष्टीचबी सोनं करतोस तू... 'सिनेमा इंडीया' जगभरात लखलखतोय, झळाळतोय तुझ्या मिडास टच मुळं ! रूंब रूंब रूंब नांद्री... आणि लब्यू लैच.”

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

WhatsApp: व्हॉट्सअ‍ॅपवर ऑनलाईन आहात; मित्रांनाही कळणार नाही, करा 'ही' एक सेटिंग

Santosh Juvekar: हिंदी नाटकानंतर संतोष जुवेकर लवकरच झळकणार नव्या चित्रपटात; साकारणार ही महत्वाची भूमिका

Maharashtra Live News Update: आमदार गोपीचंद पडळकररांकडून जयंत पाटलांवर खालच्या पातळीवर गंभीर टीका

Tulja Bhawani Temple : तुळजाभवानी मंदिर परिसरात एआय कॅमेरे; नवरात्रोत्सवात होणार प्रथमच वापर

Crime : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी योगा प्रशिक्षकाला अटक; POCSO अंतर्गत गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT