Jawan 3rd Day Box Office Collection
Jawan 3rd Day Box Office CollectionInstagram

Jawan 3rd Day Collection: शाहरुखच्या ‘जवान’ची रेकॉर्ड ब्रेक कमाई; तिसऱ्याच दिवशी २०० कोटींचा टप्पा पार

Jawan Box Office Collection: चित्रपटाने तिसऱ्या दिवशी देखील बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेक कमाई केली आहे.

Jawan 3rd Day Box Office Collection

अवघ्या तीन दिवसातच शाहरुखच्या ‘जवान’ने बॉक्स ऑफिसवर दणदणीत कमाई केली आहे. प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी या चित्रपटाने जगभरात १२० कोटींचा आकडा गाठला होता. दुसऱ्या दिवशी सुद्धा चित्रपटाने कमाईचा आकडा उत्तम ठेवला आहे. आता चाहत्यांना उत्सुकता आहे, तिसऱ्या दिवसाच्या कमाईचा आकडा जाणून घेण्याची. चित्रपटाने तिसऱ्या दिवशी देखील बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेक कमाई केली आहे.

Jawan 3rd Day Box Office Collection
Radha Sagar Good News: अभिनेत्री राधा सागरच्या घरी चिमुकल्याचे आगमन, सोशल मीडियावर फोटो केला शेअर

चित्रपटाने पहिल्या दिवशी तब्बल १० चित्रपटांचा आकडा पार दमदार ‘पठान’, ‘गदर २’, ‘बाहुबली २’, ‘केजीएफ २’ यांसारख्या हिट चित्रपटाचा रेकॉर्ड मोडत चित्रपटाने आपले नाव सुवर्ण अक्षरात कोरले आहे. चित्रपटाची घोषणा झाल्यापासूनच चित्रपटाची जबरदस्त चर्चा सुरू आहे. या चित्रपटाचा ट्रेलर दुबईच्या बुर्ज खलिफावर झळकला होता. चित्रपटाची चर्चा एकट्या भारतात नाही तर, जगभरात होत आहे. नुकतंच सॅकल्निक या संकेतस्थळाने दिलेल्या माहितीनुसार चित्रपटाने तिसऱ्या दिवशी ७४. ५ कोटींची कमाई केली आहे.

Jawan 3rd Day Box Office Collection
Genelia Deshmukh Pregnency Rumours: जिनिलीया देशमुख खरंच प्रेग्नेंट आहे का?, रितेश सोबतच्या व्हिडीओमुळे होतेय चर्चा

जबरदस्त स्टारकास्ट, उत्तम अभिनय, दमदार कथा अशी विविध केमिस्ट्री प्रेक्षकांना चित्रपटामध्ये पाहता येणार आहे. चित्रपटात दाखवलेल्या धमाकेदार सीन्सचे सध्या सोशल मीडियावर तुफान कौतुक केलं जात आहे. त्यामुळेच तिसऱ्या दिवशीही ‘जवान’ची छप्परफाड कामगिरी बॉक्स ऑफिसवर दिसून येत आहे. चित्रपटाने तिसऱ्या दिवशी एकूण ७४. ५ कोटींची कमाई केली आहे. हिंदी भाषेत चित्रपटाने ६६ कोटी, तमिळ भाषेत चित्रपटाने ५ कोटी, तर तेलुगू व्हर्जनमध्ये ३.५ कोटींची कमाई केली आहे. तिसऱ्या दिवशीच चित्रपटाने २०० कोटींच्या पल्ला गाठला आहे.

‘जवान’ने पहिल्या दिवशी ७५ कोटी, दुसऱ्या दिवशी ५३.२३ कोटी तर तिसऱ्या दिवशी ७४.५ कोटींची बॉक्स ऑफिसवर धमाकेदार कमाई केली आहे. चित्रपटाने आतापर्यंत एकूण २०२.७३ कोटी रुपयांचे कलेक्शन केले आहे. ‘जवान’ प्रदर्शित होण्यापूर्वीच चित्रपटाने जवळपास काही कोटींचा पल्ला गाठला होता. शाहरुखसह सर्वच स्टारकास्टच्या अभिनयाची सोशल मीडियावर तुफान चर्चा होत आहे.

वीकेंडला हा चित्रपट चांगलीच जादू दाखवण्याची शक्यता वर्तवली आहे. शुक्रवारी सुट्टी नसल्यामुळे चित्रपटाच्या कमाईवर परिणाम झाला होता. शनिवारी चित्रपटाचा आलेख पुन्हा वाढला असून आता रविवारी हा चित्रपट किती कमाई करणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरलं आहे.

Jawan 3rd Day Box Office Collection
Prasad Khandekar Bought New Home: ‘अजून एक स्वप्न पूर्ण…’ हास्यजत्रा फेम अभिनेत्यानं घेतलं नवं घर; घराची नाही तर नेमप्लेटची चर्चा...

चित्रपटाचं दिग्दर्शन ॲटली यांनी केलं असून निर्मिती गौरी खानने केली आहे. चित्रपट ७ सप्टेंबरपासून थिएटरमध्ये प्रदर्शित झाला असून प्रमुख भूमिकेत शाहरूख खान, नयनतारा, विजय सेथुपती, सान्या मल्होत्रा, प्रियामणी, अश्लेषा ठाकूर, लहर खान, रिद्धी डोगरा, संजीता भट्टाचार्य, गिरीजा ओक आणि आलिया कुरेशी हे सेलिब्रिटी आहेत. हिंदी, तमिळ, तेलुगू या तीन भाषेमध्ये ‘जवान’ थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com