Amruta Deshmukh Prasad Jawade Marriage Instagram
मनोरंजन बातम्या

Prasad- Amruta Wedding: मराठमोळा अंदाज अन् शाही विवाहसोहळा…; अमृता देशमुख-प्रसाद जवादेचा लग्नसोहळा थाटामाटात संपन्न

Prasad Jawade Amruta Deshmukh Wedding: बिग बॉस फेम अमृता देशमुख आणि प्रसाद जवादेचा थाटामाटात विवाहसोहळा पार पडला.

Chetan Bodke

Amruta Deshmukh Prasad Jawade Marriage

बिग बॉस फेम अमृता देशमुख आणि प्रसाद जवादे यांनी काल सायंकाळी पुण्यात लग्नगाठ बांधली. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्या लग्नाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत आहे. त्यांच्या लग्नातील फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहेत.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

अमृता देशमुखने लग्नामध्ये गुलाबी रंगाची भरजरी साडी, नाकात नथ, गळ्यात दागिने, कपाळी चंद्रकोर असा खास लूक केला होता. तर प्रसाद जवादेने अमृताच्या लूकला मॅच होईल असे, पिवळ्या रंगाचं पितांबर परिधान केले होते.

लग्नामध्ये सप्तपदी घेताना दोघांच्याही खास मराठमोळ्या लूकने सर्वांचेच लक्ष वेधले. अमृताने लग्नामध्ये सप्तपदी घेतानाचा व्हिडीओ शेअर करताना, “आमच्या आयुष्यातला खास दिवस १८/११/२०२३” असं हटके कॅप्शन अमृताने दिले आहे.

त्यांच्या लग्नातील फोटो आणि व्हिडीओ चांगलेच व्हायरल होत आहेत. त्यांच्या ह्या व्हिडीओवर अनेक सेलिब्रिटी मित्रांसह चाहत्यांनीही कमेंट करत कौतुक केले.

यावेळी त्यांच्या लग्नाला अनेक मराठी सेलिब्रिटींनी उपस्थिती दर्शवली होती. अनेकांनी त्यांच्या हळद आणि मेहंदीच्या कार्यक्रमाला सुद्धा उपस्थिती दर्शवली होती. सर्वांच्या डान्सने प्रेक्षकांचे लक्ष वेधले होते. यावेळी नम्रता संभेराव, ओंकार राऊत, प्रसाद खांडकेकर, प्रार्थना बेहरे, रसिका वेंगुर्लेकर सह अनेक सेलिब्रिटींनी लग्नाला उपस्थिती लावली होती.

दरम्यान, प्रसाद- अमृताच्या लग्नाची लगीनघाई गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहे. १६ तारखेला सोशल मीडियावर त्यांनी खास मराठमोळा लूक करत प्री- वेडिंग शूट सारखा शूट त्यांनी केले होते. दोघांचीही ‘बिग बॉस मराठी ४’ घरामध्ये झाली. आधी मैत्री आणि नंतर त्या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. दोघांच्याही कामाबद्दल सांगायचे तर, अमृता पेशाने रेडिओ जॉकी (RJ) असून प्रसाद जवादे पेशाने अभिनेता आहे. त्याने मालिकेतून आणि चित्रपटातून चाहत्यांचे मनोरंजन केले. (Entertainment News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Boat accident: समुद्रात नाव उलटली, १५ मुलांसह १३९ जणांचा मृत्यू; ११६ जण बेपत्ता

Maharashtra News Live Update: पदवीधर निवडणुकीत महाविकास आघाडीत बिघाडी

Congress Protest Live Update : दिल्लीत भाजप महिला मोर्चाचं काँग्रेसविरोधात आंदोलन, पाहा व्हिडीओ

8th Pay Commission: फिटमेंट फॅक्टर कमी झाला तरी पगार वाढणार? २.१ च्या फॉर्मुल्याचे गणित समजून घ्या

Skin Care: चेहऱ्यावरील डाग कमी करण्यासाठी लावा बटाट्याचा रस; मिळेल ग्लोईंग स्मूद स्किन

SCROLL FOR NEXT