Ruchira Jadhav And Rohit Shinde  Instagram/ @ruchira_rj
मनोरंजन बातम्या

Bigg Boss Season 4: चावडीत रुचिराने घेतला भलत्यासाठीच उखाणा; पण रोहितची 'अळीमीळी गुपचिळी'

गेल्या शनिवारी बिग बॉसच्या घरात पहिली चावडी भरली होती. रुचिरा आणि रोहित फ्रेंच फ्राईज खाताना अमृता धोंगडे तयार होऊन येते. त्यावेळी रुचिरा अमृताला पाहून तिचे कौतूक उखाण्यातून करते.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: पहिल्या दिवसापासून वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या बिग बॉस मराठीमध्ये (Bigg Boss) प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन करत आहे. सध्या घरात दुसरा आठवडा सुरु असून गेल्या दहा दिवसांपासून (Marathi Entertainment News) हे सर्व स्पर्धक घरात एकत्र राहत आहेत. सर्व स्पर्धक एकमेकांचे चांगले मित्र व्हायला लागले असून गप्पा गोष्टी, शेअरिंग विथ केअरिंग ही सध्या दिसत आहे. स्पर्धकांमध्ये जेवढे एकमेकांमध्ये भांडण ते एकमेकांशी गप्पा, मज्जा, स्पर्धकांची टिंगल-टवाळी करतात. सध्या अशीच एक व्हिडिओ भरपूर व्हायरल होत आहे. त्यात रुचिराने रोहितसाठी उखाणा घेतला.

बिग बॉसच्या घरातील एक क्युट कपल म्हणून नावारुपाला आलेली जोडी म्हणजे रुचिरा आणि रोहित शिंदे. या दोघांनी एकत्रित घरात एन्ट्री केली. या एन्ट्रीने साऱ्यांचेच लक्ष वेधून घेतले आहे. हे प्रेमीयुगल घरात काय रंगत आणणार हे आपल्याला येता काळच सांगेल. परंतू या दोघांनीही बिग बॉसच्या नजरेसमोर किंवा स्पर्धकांच्या समोर येतील असे काही कृत्ये केलेली नाहीत. दोघेही आपल्या परिने उत्तम खेळण्याचा प्रयत्न करत आहेत.

दरम्यान रुचिराच्या या उखाण्याने साऱ्यांचेच लक्ष वेधून घेतले आहे. गेल्या शनिवारी बिग बॉसच्या घरात पहिली चावडी भरली होती. या दिवशी सर्वांनाच आपल्या आवडीचे जेवण मिळते. तेव्हा सर्वजण एकत्र बसून खाताना अचानक रुचिराने खास व्यक्तीसाठी उखाणा घेतलाय. पण हा उखाणा रोहितसाठी नाहीतर अमृता धोंगडेसाठी होता. रुचिरा आणि रोहित फ्रेंच फ्राईज खाताना अमृता धोंगडे तयार होऊन येते. त्यावेळी रुचिरा अमृताला पाहून तिचे कौतूक उखाण्यातून करते.

ती म्हणते, "केचअप शिवाय फ्राइज म्हणजे बिस्किट शिवाय चहा, आमची अमृता तयार झालीये जरा तिला सगळ्यांनी पाहा". रुचिराच्या उखाण्यावर अमृता थँक्यू म्हणते. "पण त्यात थोडं चिकन मटण अॅड केलं असतंस तर अजून भारी झालं असतं" , असंही म्हणते. या सगळ्यावर रोहित मात्र काहीच बोलत नाही. तो गपचूप पुढ्यात असलेले फ्राइज खात असतो.

Edit By: Chetan Bodke

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Viral Video: बूट चोरण्यासाठी भर मंडपात नवरदेवाला आडवं पाडलं|VIDEO

Atal Setu : जे. जे. हॉस्पिटलच्या डॉक्टरची अटल सेतूवरून उडी, नवी मुंबईत खळबळ

Maharashtra Live News Update : महाराष्ट्रात मराठी माणसांची मुस्कटदबी सुरू, मनसे कार्यकर्त्यांचा संताप

Women Scheme: आता महिलांना करता येणार मोफत प्रवास, लाँच केलं सहेली स्मार्ट कार्ड; कोणाला होणार फायदा

MNS Protest: नेत्यांची धरपकड, पोलिसांनी परवानगी नाकारली; मीरा-भाईंदरमध्ये मनसेचा मोर्चा निघणार की नाही?

SCROLL FOR NEXT