New Bigg Boss Logo Saam Tv
मनोरंजन बातम्या

Bigg Boss Marathi 4: बिग बॉसच्या स्पर्धकांमधील संयमाचा बांध फुटला, अखेर तो क्षण आला....

आजवर आपण सर्वांनीच या घरात मारा-मारी, भांडण, वाद, एकमेकांची इज्जत काढणे हा सर्व प्रकार गेल्या ८० दिवस अवघ्या महाराष्ट्राने अनुभवलं.

Chetan Bodke

Bigg Boss Marathi 4: २ ऑक्टोबरपासून सुरु झालेल्या बिग बॉसच्या शो ला आता ८० दिवस पूर्ण होत आहेत. दररोज खेळातील नव- नवे ट्वीस्ट स्पर्धकांसह प्रेक्षकांना अनुभवता येत आहे. दिवसेंदिवस हा खेळ जितका रंजक तितकाच उत्कंठावर्धक ठरत आहे. आजवर आपण सर्वांनीच या घरात मारा-मारी, भांडण, वाद, एकमेकांची इज्जत काढणे आणि अगदी खालच्या थराला जाऊन स्पर्धकांनी एकमेकांना केलेली शिवगाळ हा सर्व प्रकार गेल्या ८० दिवस अवघ्या महाराष्ट्राने अनुभवलं.

प्रत्येक स्पर्धक आपल्याला सिद्ध करण्यासाठी कोणता तळ गाठायचा आहे,इथपर्यंत त्यांची सध्या मजल जात आहे. या सीझनला अनेकदा फेअर- अनफेअरवरुन सोशल मीडियावर ट्रोलही करण्यात आले होते. गेल्या इतका दिवस इतर स्पर्धकांचा सहन केलेल्या रागाचा आता अंत कदाचित जवळ येत आहे. पण आज बिग बॉसच्या घरात सर्व स्पर्धकांना एक अनोखं सरप्राईज मिळाले आहे. नुकतेच शेअर करण्यात आलेल्या प्रोमोत सर्व स्पर्धकांचा आजवर कधी न फुटलेला संयमाचा बांध फुटणार आहे.

शेअर करण्यात आलेल्या प्रोमोत, एरव्ही नेहमी सर्वांच्या पुढे भांडायला उभे असणारे स्पर्धकही ओक्षापोक्षी रडताना दिसत आहे. बिग बॉसच्या घरातील एक हळवा प्रसंग म्हणजे जेव्हा स्पर्धकांना त्यांचे घरचे भेटायला येतात. प्रत्येक सीझनमध्ये स्पर्धकांना त्यांचे आई-वडिल भेटायला येत असतात. ८० दिवस घरच्यांच्या संपर्काशिवाय राहणाऱ्या स्पर्धकांना शेवटच्या आठवड्यात आपल्या घरच्यांना भेटण्याची संधी मिळते. असाच आजचा दिवस असणार आहे.

शेअर केलेल्या प्रोमोत, घरात आज सर्व सदस्य रडताना दिसले. संपूर्ण स्पर्धकांसाठी हा क्षण खुपच भावनिक असतो. नुकताच एका भागात अमृताने घरच्यांची आठवण येत असल्याचे बिग बॉसला सांगितले होते. सोबतच ती काही किस्सा सांगताना यावेळी भावूकही झाली होती. आजच्या भागात अमृता धोंगडेला अचानक आई- वडिल समोर दिसताच जोरात किंचाळत रडू लागते. यावेळी तिचे पालक तिला सांगतात, 'पोरी आता रडायचं नाही, लढायचं...'

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nagpur : पिकांच्या संरक्षणासाठी तारेत सोडला विद्युत प्रवाह; चारा कापताना झाला घात, विजेच्या धक्क्याने एकाचा मृत्यू

Aamhi Saare Khavayye : खुशखबर! मराठी कुकिंग शो 'आम्ही सारे खवय्ये' येतोय? पाहा VIDEO

Rave Party: रेव्ह पार्टी म्हणजे नेमकं काय?

Maharashtra Live News Update: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये कार्यकर्त्यांची इच्छा - नितेश राणे

Masala Gobi Recipe : कोबीच्या भाजीला द्या खास ट्विस्ट, मुलं ५ मिनिटांत फस्त करतील टिफिन

SCROLL FOR NEXT