Bigg Boss Marathi Episode Update Saam Tv
मनोरंजन बातम्या

Bigg Boss Marathi 4: "मला तुझा राग कळत आहे..." - अपूर्वाने विकासकडे व्यक्त केली खंत

विकास त्याची नाराजी अपूर्वाकडे बोलून दाखवत असल्याचे आपल्याला या भागात पाहायला मिळणार आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Bigg Boss Marathi 4 Update: 'बिग बॉस मराठी 4'च्या चौथ्या आठवड्याला कालपासून सुरूवात झाली. चावडीनंतर सुरू झालेला दुसरा दिवस हा नेहमीपेक्षा वेगळाच असतो. स्वतःविषयी समजलेल्या गोष्टींच्या विचारात स्पर्धक असतात. त्यानुसार त्यांचा वागणं आणि बोलणं बदलतं.

चावडीच्या दुसऱ्या दिवशी 'बिग बॉस मराठी'च्या घरामध्ये “नॉमिनेशन रॉकेट” हे नॉमिनेशन कार्य पार पडले. नॉमिनेशन कार्याअंती किरण माने, अमृता देशमुख, त्रिशूल मराठे , विकास सावंत, योगेश जाधव, आणि प्रसाद जवादे हे सदस्य नॉमिनेट झाले आहेत. आता या आठवड्यात कोणत्या सदस्याला घराबाहेर जावे लागेल, हे येत्या रविवारी आपल्याला कळेल. (Bigg Boss Marathi)

या नॉमिनेशन प्रक्रियेमध्ये विकासचे नाव आल्याने तो जरा नाराज आहे. विकास त्याची नाराजी अपूर्वाकडे बोलून दाखवत असल्याचे आपल्याला या भागात पाहायला मिळणार आहे. विकासाची ही नाराजी दूर करण्यासाठी अपूर्वा त्याची समजूत काढताना आणि त्याला समजावना दिसणारा आहे.

अपूर्वा विकासाला म्हणते, "मला तुझा राग कळतो आहे सगळ्यांनी मिळून तुला नॉमिनेट केले आहे. तुला कुठेतरी तो inferiority कॉम्प्लेक्स आहे असं मला जाणवतं आहे. तुला असं वाटतं आहे फक्त दाद्या तुला समजून घेतो. काय होतं ना तू जरी शंभर टक्के बरोबर असला तरी पण दिसताना असं दिसत आहे की त्यांच्या मेंदूने तू गेम खेळतो आहेस. जेव्हा की असं नाहीये आणि म्हणून तुझी चीडचीड होते आहे. कारण तुझी निर्णयक्षमता मी बघितली आहे म्हणून आज मी तुला नॉमिनेट नाही केलं. कारण जिथे दादा नाहीये तिथे मी तुला तुझे निर्णय घेताना आणि खेळ खेळताना पहिले आहे... आत बघूया यांच्यात अजून काय चर्चा होते ते. " (Program)

अपूर्वाचे हे म्हणणे विकासाच्या लक्षात आले असेल का? यावर त्याचा निर्णय काय असेल आणि तो यावर कसा रिअॅक्ट होईल, हे आपल्याला आजच्या भागात पाहता येणार आहे. 'बिग बॉसच्या घरात कधी कोणाची मैत्री होईल आणि कधी कोणाची दुश्मनी हे सांगता नयेत नाही. त्यामुळे 'बिग बॉसचे घर प्रेक्षकांसाठी काहीतरी नवीन घेऊन येत असते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sushil Kedia: एक दणका आणि केडीयाचा माफीनामा; अखरे मराठीद्रष्ट्या सुशील केडियाची अखेर माफी

Ryanair Fire : विमानाला लागली अचानक आग; जीव वाचवण्यासाठी प्रवाशांच्या उड्या, व्हिडिओ आला समोर

Stomach Ache: पोटदुखी, गॅस, अ‍ॅसिडिटीने त्रस्त आहात? मग करा 'हे' सोपे उपाय

Maharashtra Live News Update: काटई - बदलापूर रोडवर कारला लागली आग

मोठी बातमी! विजयाच्या मेळाव्यानंतर राजकीय घडामोडींना वेग; ठाकरे गटाकडून भाजपच्या मोठ्या नेत्याला ऑफर?

SCROLL FOR NEXT