Bigg Boss Marathi 3: कीर्तनकार शिवलीला पाटील का होतेय ट्रोल? Saam Tv News
मनोरंजन बातम्या

Bigg Boss Marathi 3: कीर्तनकार शिवलीला पाटील का होतेय ट्रोल?

सोशल मीडियावर शिवलीलाताई या नावानं ती प्रसिद्ध आहे. मात्र ती बिग बॉसच्या घरात सामील झाल्यानं तिला प्रचंड ट्रोल केलं जातयं.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

कलर्स मराठी वाहिनावर येणार शो बिग बॉस मराठी सीजन ३ चा पहिला एसिसोड धुमधडाक्यात पार पडला. यंदा बिग बॉसच्या घरात विविध क्षेत्रातील स्पर्धकांना स्थान देण्यात आलं आहे. यात प्रसिद्ध महिला कीर्तनकार शिवलीला पाटील हिला सुद्धा स्थान देण्यात आलं आहे. सोशल मीडियावर शिवलीलाताई या नावानं ती प्रसिद्ध आहे. मात्र ती बिग बॉसच्या घरात सामील झाल्यानं तिला प्रचंड ट्रोल केलं जातयं.

हे देखील पहा -

शिवलीलाचा बिग बॉस शो मध्ये सहभागी होण्याचा निर्णय अनेकांना आवडलेला नाही. यात तिचं कीर्तन ऐकणारे श्रोते मोठ्या प्रमाणात आहेत, ज्यांना तिने उचललेलं हे पाऊल आवडलेलं नाही. त्यामुळे अनेकांनी नाराजी व्यक्त केली तर काहींनी प्रखर आणि कडक शब्दात टीका करत तिला ट्रोलही केल आहे. एका इंस्टाग्राम युजरने लिहिलं की, ''वयस्कर बायांना मालिका बघता म्हणून नाव ठेवते आणि तू स्वतः फालतू शो मध्ये जाते मग तुला नाही का लाज वाटत, लोकांना ब्रम्हज्ञान सांगत होतीस पण स्वतः कोरडी पाषाण निघालीस आणि हो वारकरी संप्रदायाचे नाव घेऊन मत मागायचे भिकार धंदे करू नकोस''

तर दुसऱ्या युजरने कमेंट केली की, ''तिथे गेल्यावर, स्वतः ला मी कीर्तन कार अहे म्हणून सांगू नका. तसेही तुमच्या किर्तनात अध्यात्म कमी फालतू गोष्टींवर लक्ष देता तुम्हीं. सर्वांना समजत आहे तुम्हीं कश्याला गेला आहेत असल्या शो मधे, पैश्याचा मोह आवरत नव्हता तर कश्याला वारकरी संप्रदायाला बदनाम करण्यासाठी कीर्तन कार झाल्या तुम्हीं'' अशा अनेक संपप्त प्रतिक्रयांचा अक्षरशः पाऊस पडला आहे.

कलर्स मराठीने इंटाग्रामवर एक व्हिडिओ शेयर केला आहे, ज्यात शिवलीला रडताना दिसतेय. यावरही नौटंकी म्हणत तिल अनेकांनी धारेवर धरलंय.

यात एकाने म्हटलं की, ''शिवलिलाताई बाहेर ओढा ह्या घाणीतुन ,तुमचा प्रांत नाही हा'' तर दुसऱ्या एका युजरने अतिशय संतापात लिहिलं की, ''किर्तन कारांना भिकारचोट शोमधे भाग घेऊ नये. आणि अशा शोमधे भाग घेणाऱ्यांनी स्वतः किर्तनाला ऊभे राहू नये. आपली लायकी नाही असे समजावे.'' अशा प्रकारच्या अनेक संतप्त प्रतिक्रीयांनी तिला ट्रोल केलं जातंय. त्यामुळे बिग बॉसच्या घरातून बाहेर आल्यावर तिला कीर्तन करणं काहीसं जड जाऊ शकतं. शिवाय तिचं कीर्तन ऐकण्यास लोक उत्साही असतील का असाही प्रश्न निर्माण झाला आहे.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ind vs Aus: विजयी चौकार मारून जेमिमाला अश्रू अनावर; भर मैदानात कर्णधार हरमनप्रीतलाही कोसळलं रडू, पाहा Video

Farmer Loan Waiver: शेतकऱ्यांना कधी मिळणार कर्जमाफी? मुख्यमंत्र्यांनी सांगितली तारीख

Ind vs Aus Semifinal: शाब्बास पोरींनो! भारताच्या लेकींनी मैदान गाजवलं, ऑस्ट्रेलियाला नमवत फायनलमध्ये दणक्यात एन्ट्री

WC Semifinal: मानधनाच्या विकेटवर भरमैदानात राडा; थर्ड अंपायरच्या निर्णयानं फलंदाजासह ग्राउंड रेफरीही बुचकळ्यात

Maharashtra Opposition Unity : मतदारयाद्यांचा घोळ, निवडणुकीला विरोध? 'सत्याचा मोर्चा'साठी विरोधक एकवटले, VIDEO

SCROLL FOR NEXT