पटोलेंनी गडकरींविरोधात दाखल केलेल्या याचिकेवर आज सुनावणी शक्य

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी न्यायालयाचा अवमान केला असून त्यांच्याकडे असलेले सर्व विशेषाधिकार काढून घेण्यात घ्यावे आणि तसे आदेश उच्च न्यायालयाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना द्यावेत, अशी विनंती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात केली आहे.
नितीन गडकरी, नाना पटोले
नितीन गडकरी, नाना पटोले- Saam Tv
Published On

नागपूर : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी Nitin Gadkary यांनी न्यायालयाचा Court अवमान केला असून त्यांच्याकडे असलेले सर्व विशेषाधिकार काढून घेण्यात घ्यावे आणि तसे आदेश उच्च न्यायालयाने पंतप्रधान नरेंद्र मोदी Narendra Modi यांना द्यावेत, अशी विनंती काँग्रेसचे Congress प्रदेशाध्यक्ष नाना पटोले Nana Patole यांनी उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात केली आहे. Nana Patole petition against nitin gadkary

याबाबतचा अर्ज काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल केला आहे. गडकरी यांनी २०१९च्या लोकसभा निवडणुक शपथपत्रात गडकरींनी आपली संपत्ती, उत्पन्न, वैयक्तिक माहिती चुकीची दिल्याचा दावा नाना पटोले यांनी केला आहे.

नितीन गडकरी, नाना पटोले
सुहास कांदे आणि छगन भुजबळ यांच्यात पुन्हा संघर्ष

मात्र, गेल्या सुनावणीत गडकरींनी पलटवार केला होता. पटोलेंनीच या याचिकेसाठी दाखल केलेले शपथपत्र बेकायदेशीर असल्याचा अर्ज गडकरी यांच्याकडून दाखल करण्यात आला होता. पटोलेंचे वकील सतीश उके यांनी याला विरोध केला असून पटोलेंचे शपथपत्र नियमांनुसारच असल्याचा दावा केला आहे. याबाबत आज सुनावणी होण्याची शक्यता आहे.Nana Patole petition against nitin gadkary

गडकरी यांच्या विरोधात इलेक्शन पिटीशन दाखल केले आहे. याचा लवकर निकाल लागावा अशी अपेक्षा आहे. गडकरींच्यी ॲफीडेव्हीटमध्ये चुका असल्याचा आक्षेप आम्ही घेतला होता, आमच्या पिटीशनमध्ये तथ्य आढळल्यानं आमच्या पिटीशनवर सुनावणी सुरु आहे, असे पटोले यांनी 'साम टिव्ही'शी बोलताना सांगितले.

Edited By - Amit Golwalkar

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com