सुहास कांदे आणि छगन भुजबळ यांच्यात पुन्हा संघर्ष

भुजबळांनी नियोजन समितीच्या निधीत गैरव्यवहार केल्याचा आरोप
सुहास कांदे आणि छगन भुजबळ यांच्यात पुन्हा संघर्ष
सुहास कांदे आणि छगन भुजबळ यांच्यात पुन्हा संघर्षSaam Tv
Published On

नाशिक - नांदगावचे शिवसेना आमदार सुहास कांदे Suhas Kande आणि पालकमंत्री छगन भुजबळ chhagan bhujbal यांच्यातला वाद पुन्हा उफाळला असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे. भुजबळांनी नियोजन समितीच्या निधीत गैरव्यवहार केल्याचा आरोप शिवसेनेचे Shivsena आमदार सुहास कांदे यांनी केला आहे. यासाठी आता शिवसेना आमदार सुहास कांदे यांनी छगन भुजबळ यांच्या विरोधात हायकोर्टात धाव घेतली आहे.

हे देखील पहा -

जिल्हा नियोजन समितीतील कामे मर्जीतील ठेकेदारांना देऊन गैरव्यवहार केल्याचा कांदे यांनी गंभीर आरोप पालकमंत्री छगन भुजबळ यांच्यावर केला आहे. 14 दिवसांपूर्वी भुजबळ नांदगावच्या पूर परिस्थिती पाहणी दौऱ्यावर असतांनाही कांदे आणि भुजबळांमध्ये शाब्दिक चकमक झाल्याचे पाहायला मिळाले होते.

सुहास कांदे आणि छगन भुजबळ यांच्यात पुन्हा संघर्ष
संतापजनक! ऑनलाईन क्लासमध्ये अज्ञात व्यक्तीकडून अश्लील कृत्य...

नेमकं काय घडलं होत ?

11 सप्टेंबरला नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ हे उत्तर महाराष्ट्रातील पूरग्रस्त भागाच्या दौऱ्यावर होते आणि त्यांचा हा दौरा वादळी ठरला. कारण शिवसेना आमदार सुहास कांदे Suhas Kande आणि छगन भुजबळ यांची जोरदार खडाजंगी झाली. भर बैठकीत आमदार कांदे आणि भुजबळ यांच्यात बाचाबाची झाली. आपत्कालीन निधीच्या मुद्द्यावरून यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली होती.

यानंतर आमदार सुहास कांदे यांच्या समर्थकांनी पालकमंत्र्यांसमोर जोरदार घोषणाबाजी देखील केली होती. उत्तर महाराष्ट्रातील पूरग्रस्त निधीवरुन तात्काळ मदतीची मागणी आमदार सुहास कांदे यांनी केली. सांगली-कोल्हापूरच्या महापुरावेळी जशी मदत दिली होती, तशीच तात्काळ मदत मिळावी अशी मागणी त्यांनी यांनी केली होती. यावेळी भुजबळांनीही तशीच मदत दिली जाईल असे स्पष्ट केले होते. मात्र भर बैठकीत आमदार कांदे आणि भुजबळ यांच्यात बाचाबाची सुरु होती.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com