Sai Lokur Blessed With A Baby Girl Instagram/ @sai.lokur
मनोरंजन बातम्या

Sai Lokur: ‘बिग बॉस’ फेम अभिनेत्रीला कन्यारत्न, पोस्ट शेअर करत दिली गोड बातमी...

Sai Lokur Post: बिग बॉस मराठी फेम सई लोकुरने नुकतंच एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे.

Chetan Bodke

Sai Lokur Blessed With A Baby Girl

बिग बॉस मराठी फेम सई लोकुर सोशल मीडियावर कमालीची सक्रिय दिसत आहे. काल (१७ डिसेंबर) सायंकाळी एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे. तिने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत चाहत्यांसोबत गुड न्यूज शेअर केली आहे. चाहत्यांसोबत ही गोड बातमी शेअर करताच चाहत्यांनी तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सई लोकुरने शेअर केलेल्या पोस्टमध्ये म्हटलंय, “आम्हाला मुलगी झाली आहे, ही गोष्ट सांगताना आम्हाला खूप आनंद होतोय. आई आणि बाळ दोघेही व्यवस्थित आहेत. या काळामध्ये मिळालेल्या पाठिंब्यासाठी, आशिर्वादासाठी तुमच्या सर्वांचे मनापासून आभार...” अशी पोस्ट सईने शेअर केली आहे. (Marathi Actress)

फक्त चाहत्यांनीच नाही तर अनेक सेलिब्रिटींनीही तिच्या पोस्टवर कमेंट केली आहे. सुकन्या मोने म्हणतात, ‘Awww..... मनःपूर्वक अभिनंदन आणि छकुली च स्वागत.’ तर एका फॅनने कमेंट केली की, ‘सई लोकुर तू एका गोंडस मुलीला जन्म दिला, तुझे आणि तुझ्या कुटुंबियांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन...’ तर बऱ्याच जणांनी अभिनंदन म्हणत तिच्यावर आणि तिच्या कुटुंबीयांवर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. (Social Media)

सई लोकुर आणि तीर्थदीप रॉय नोव्हेंबर २०२० मध्ये लग्नबंधनामध्ये अडकले होते. सई लोकुर बिग बॉस मराठीच्या पहिल्या सीझनमध्ये आली होती. त्यानंतर तिच्या लोकप्रियतेत प्रचंड वाढ झाली आहे. सध्या सई कोणत्याही चित्रपटामध्ये दिसत नाही. बिग बॉस मराठीनंतर सई अभिनेता पुष्कर जोगसोबत एका वेब सीरीजमध्ये दिसली होती. त्यानंतर ती कोणत्याही प्रोजेक्टमध्ये दिसली नाही. (Entertainment News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gen-Z Podcast Bulletin : टीव्ही विश्वातील पहिलं Gen Z बुलेटिन फक्त साम टीव्हीवर; कधी आणि कुठे-कुठे बघायला मिळणार? वाचा

वनरक्षकालाच वाघानं उचलून नेलं? हल्ला करतानाचा वाघाचा व्हिडिओ?

Mumbai Voter List: मुंबईत मतदारयाद्यांमध्ये मोठा घोळ; ३५० हून अधिक मतदारांना पत्ताच नाही, मनसेकडून आंदोलनाचा इशारा

Accident : अपघाताचा थरार! भरधाव बस आणि कंटेनरची समोरासमोर धडक; दोन्ही वाहनांचा चुराडा

Maharashtra Politics: राज ठाकरे मविआत सामिल होणार? मनसेसाठी शरद पवार आग्रही?

SCROLL FOR NEXT