Bigg Boss Marathi Season 4 Instagram @colorsmarathi
मनोरंजन बातम्या

Bigg Boss Season 4: आज रंगणार दुसरी चावडी; मांजरेकरांच्या निशाण्यावर कोण कोण खेळाडू असणार?

या आठवड्यातील चावडीत सर्व चांगल्या वाईट गोष्टींची मांजरेकर शाळा घेतात. अशातच आता कलर्स मराठीच्या इन्स्टाग्राम पेजवर दुसऱ्या चावडीचा प्रोमो शेअर करण्यात आला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: सध्या हिंदी बिग बॉससोबत मराठी बिग बॉसची भरपूर चर्चा रंगली (Bigg Boss) आहे. पहिल्या दिवसापासून सुरु झालेल्या राड्याला आता थोडे नमते होताना दिसत आहे. अशा रंजक पद्धतीने सुरु झालेल्या बिग बॉसच्या घरातील वातावरण आता हसते खेळते होत आहे. त्यामुळे अगदी लहानग्यांपासून ते मोठ्यांपर्यंत बिग बॉसची चर्चा होत आहे. नुकताच काल बिग बॉसच्या घराला नवा कॅप्टनही मिळाला आहे. त्यामुळे घरातील वातावरण सध्या आनंदीत झाले आहे. आज बिग बॉसच्या घरात दुसरी चावडी रंगणार असून स्पर्धकांसोबतच प्रेक्षकांनाही चावडीची भरपूर उत्सुकता आहे. (Marathi Entertainment News)

या आठवड्यातील चावडीत सर्व चांगल्या वाईट गोष्टींची मांजरेकर शाळा घेतात. अशातच आता कलर्स मराठीच्या इन्स्टाग्राम पेजवर दुसऱ्या चावडीचा प्रोमो शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओत असे दिसते की, मांजरेकर या आठवड्यात झालेल्या सगळ्या गोष्टींमुळे खेळाडूंना वठणीवर आणण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यामुळे आता महेश मांजरेकरांच्या चावडीवर कोणता खेळाडू लागणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

गेल्या आठवड्यात चावडीवर महेश मांजरेकरांनी अपूर्वाची चांगलीच शाळा घेतली होती. तरीही या आठवड्यात तिचा काही आवाज कमी होताना दिसत नाही. अपूर्वाचा या आठवड्यात किरण माने, विकास सावंत यांच्यावर आवाज चढला आहे. याचेच औचित्य साधत मांजरेकर सर्वच स्पर्धकांना काय बोलणार हे आजच्या चावडीवर कळणार आहे.

पहिल्या आठवड्यात सर्व खेळाडूंचा आरडा- ओरडा झाल्यानंतर दुसऱ्या आठवड्यात घरातील वातावरण खेळीमेळीचे होते. पण बिग बॉसचे घर म्हंटल्यावर घरात छोटे मोठे वाद होतच राहतात. बिग बॉसच्या घरातील पहिली कॅप्टन समृद्धी झाली होती तर दुसरा कॅप्टन रोहित शिंदे झाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मोठी बातमी! ८-९ जुलैला राज्यातील कोणतीही शाळा बंद नाही, शिक्षण विभागाने काढले आदेश

IND vs ENG : भारताचं खातं उघडलं, इंग्लंडचं गर्वहरण, मालिकेत बरोबरी; शुभमन गिलच्या यंग ब्रिगेडनं करुन दाखवलं

Monday Horoscope : बोलण्यापेक्षा कृतींवर लक्ष द्या; 'या' राशींच्या लोकांची भरभराट होणार

मस्क यांचा नवा पक्ष 'अमेरिका पार्टी', उद्योगपती मस्कही उतरणार राजकारणात; ट्रम्प यांच्या वादानंतर मस्क यांचा मोठा निर्णय

Ind Vs Eng 2nd Test : इंग्लंडचा अभेद्य किल्ला भेदला, ५८ वर्षांनी वनवास संपवला; गिलसेनेने बर्मिंगहॅममध्ये इतिहास रचला

SCROLL FOR NEXT