Sakshi Sunil Jadhav
बऱ्याचदा आपल्याला असं वाटतं की आपला मित्र आपल्यावर जळतोय. पण याचं कारण वेळीच समजून घेणं गरजेचं आहे.
तुम्ही सहज वागत असतानाही मित्र तुम्हाला अटेंशन सीकर म्हणतो.
मित्र तुमच्या जुन्या चुका सांगून इतरांसमोर कमी लेखतो.
तुमच्या यशाचं कौतुक करतानाही जर मित्र टोमणे मारत असेल तर त्याच्या पासून लांब राहा.
तुमची स्टाइल, बोलण्याची पद्धत आणि तुमच्या आवडी कॉपी करणारा मित्र तुमच्यावर जळत असतो.
तुमच्या यशाची बातमी ऐकूण तो उत्साह दाखवत नाही.
तुमच्या यशाची स्वतःच्या प्रगतीशी सतत तुलना करणारा मित्र तुमच्यावर जळत असतो.
तुमच्या वैयक्तिक चुका इतरांसमोर सांगणाऱ्या मित्रापासून लांब राहा.
ही माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. साम टीव्ही या माहितीची पूर्ण सत्यता किंवा अचूकतेची हमी देत नाही.