Bigg Boss Fame Suraj Chavan Movie Saam Tv
मनोरंजन बातम्या

Raja Rani: 'झापूक झुपूक' नंतर आता 'बुंग बुंग बुंगाट, सूरज चव्हाणचं नवं गाणं पाहिलात का?

Bigg Boss Fame Suraj Chavan Movie: सूरज एका नवीन चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'राजा राणी' असं त्याच्या चित्रपटाचं नाव आहे.

Manasvi Choudhary

बिग बॉस मराठीचा पाचवा सीझन सध्या चांगलाच गाजताना दिसत आहे. अभिनेता रितेश देशमुख हा सीझन होस्ट करत आहे. बिग बॉसच्या घरात बारामतीतल्या छोट्याशा खेडेगावातला सूरज चव्हाण आपल्या हटके स्टाईलने प्रेक्षकांची मने जिंकताना दिसतो आहे. लवकरच सूरज एका नवीन चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'राजा राणी' असं त्याच्या चित्रपटाचं नाव आहे.

'राजा राणी' या चित्रपटात सूरज महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. प्रेमाची कथा असलेल्या चित्रपटात रोहन पाटील आणि वैष्णवी शिंदे ही नवी कोरी जोडी ही झळकताना दिसणार आहे. प्रेमात पडलेल्या रोहनच्या मित्राच्या भूमिकेतून सूरज प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'थोडासा भाव देना' या रोमँटिक गाण्यानंतर आता या चित्रपटातील दुसरं गाणं सोशल मीडियावर रिलीज झालं आहे. 'बुंग बुंग बुंगाट' हे गाणं प्रेक्षकांच्या भेटीस आलं आहे. या गाण्यात नायक नायिकेचा जबरदस्त डान्स पाहायला मिळत असून त्यात खलनायकाच्या एंट्रीने ट्विस्ट आणलेला दिसतोय.

'राजा राणी' चित्रपटातील 'बुंग बुंग बुंगाट' या गाण्याच्या संगीताची धुरा पी. शंकरम यांनी सांभाळली तर पार्श्वसंगीत विजय नारायण गवंडे यांचे आहे. थिरकायला भाग पाडणाऱ्या या रोमँटिक आणि धमाकेदार गाण्याला गायक आदर्श शिंदे याने त्याच्या दमदार आवाजात गायलं आहे. तर गाण्याचे बोल गोवर्धन दोलताडे यांचे आहेत. येत्या १८ ऑक्टोबरपासून हा चित्रपट सिनेरसिकांच्या भेटीस येणार असून संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs AUS : विराटसोबत ऑस्ट्रेलियात पहिल्यांदाच असं झालं, कुणाला विश्वासही बसणार नाही

Calcium Deficiency: शरीरात कॅल्शियम कमी असल्यास कोणती गंभीर लक्षणे दिसतात? जाणून घ्या

Thackeray Shivsena News : ठाकरेंच्या शिवसेना नेत्याला जीवे मारण्याची धमकी, गुंडाच्या त्या कृत्यामुळे कल्याणमध्ये संताप, वाचा नेमकं काय घडलं?

Shrutz Haasan Photos: कपाळी टिकली अन् कातील नजर, साऊथच्या अभिनेत्रीने केले तरूणांना घायाळ

पश्चिम महाराष्ट्रात काँग्रेसला खिंडार; बड्या नेत्याची भाजपच्या दिशेनं वाटचाल, राजकारण तापलं

SCROLL FOR NEXT