Social Media Marathi Creator Suraj Chavan BBM journey: मनोरंजनविश्वात बिग बॉस मराठीची सध्या तुफान चर्चा आहे. यावर्षी बिग बॉसच्या घरात ब्लॉगर, रिलस्टार, अभिनेत्री यांचा सहभाग आहे. 'गुलिगत धोका' या नावाने बिग बॉस गाजवणाऱ्या सूरज चव्हाणला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. सूरजने त्यांच्या विनोदीशैलीने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. खेडेगावातून बिग बॉसच्या घरात एन्ट्री करणारा सूरजचा आतापर्यतचा प्रवास नेमका कसा आहे? ते जाणून घेऊया.
बारामतीतील लहानश्या खेडेगावात सूरज चव्हाणचा जन्म झाला. सूरजच्या घरची परिस्थिती अत्यंत गरीबीची आहे. सात बहिणीचा एकुलता एक भाऊ सूरज आहे. चार वर्षाचा असताना सूरजच्या वडिलांचे निधन झाले. सुरजच्या वडिलांच्या निधनाचा धक्का त्याच्या आईला बसला. त्यांना ते सहन झाले नाही. यामुळे काहीवर्षांनी सूरजच्या आईचे देखील निधन झाले. सूरज आणि त्याच्या सात बहिणींचा सांभाळ त्यांच्या आत्याने केला. आई वडील नसल्याने सूरजला लहानपणी काम करण्यास भाग पडले. लहानवयात सूरज गंवडी काम करत होता.यामुळे त्याला शिक्षण घेता आले नाही. सूरजचे आठवी पर्यंतचे शिक्षण पूर्ण झाले आहे.
सूरज मोलमजुरी करत असताना त्याला टिकटॉकबद्दल समजलं.मेहनत करून सूरजने स्वत:साठी फोन घेतला. दिवसातून एक- दोन व्हिडीओ सूरज टिकटॉकवर बनवायचा. सूरजच्या व्हिडीओ व्हायरल झाल्या. सूरजच्या कॉमेडी व्हिडीओंनी नेटकऱ्यांना खिळवून ठेवलं. यानंतर टिकटॉकला बंदी आली. अशातच सूरजला शॉर्ट फिल्मसाठी ऑफर येऊ लागल्या दरम्यान त्याला इनस्टाग्रामबद्दल माहिती मिळाली. इन्स्टाग्रामवर सूरज व्हिडीओ बनवू लागला नंतर सूरजने युट्यूबवर त्याचे अकाउंट सुरू केले. तिथे देखील तो चांगलाच व्हायरल होऊ लागला. सूरजला युट्यूबच्या माध्यमातून पैसे मिळू लागले.
सूरजला त्याच्या सूरजला टिक टॉकवर व्हिडीओ बनवायची आवड निर्माण झाली. दररोज नवनवीन कॉमेडी व्हिडीओ सूरज बनवू लागला. काही दिवसांनी सूरज त्यांच्या बहिणी आणि भांवासोबत व्हिडीओ बनवायचा. हटके कॉमेडी व्हिडीओमुळे सुरज व्हायरल होऊ लागला. सूरजचे 'गोलीगत', 'बुक्कीत टेंगूल' हे डायलॉग चांगलेच फेमस झाले. काहीदिवसांनी टिकटॉत बंद झाले. नंतर त्याच्या मित्रांनी त्याला इन्स्टाग्रामबद्दल सांगितले. सुरज इन्स्टाग्रामवर व्हिडीओ बनवू लागला. सूरजच्या कॉमेडी व्हिडीओला चांगलीच प्रसिद्धी मिळाली.
सोशल मीडियावर प्रसिद्ध असल्याने बिग बॉस मराठीमध्ये सूरजची निवड करण्यात आली.सुरूवातीला बिग बॉसमध्ये येण्यासाठी सूरज तयार नव्हता. बहिण व काही जवळच्या मंडळीनी सूरजला समजवल्यानंतर सूरज शोमध्ये येण्यासाठी तयार झाला. बिग बॉसच्या घरातून देखील सूरज प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करत आहे.अलिकडेच डान्सर गौतमी पाटीलने बिग बॉसमध्ये तिचा सपोर्ट सूरज चव्हाणला असल्याचं सांगितलं होत. बिग बॉसमुळे सूरज चांगलाच प्रसिद्ध झाला आहे. बिग बॉसमुळे सूरजला नवीन ओळख मिळाली आहे. आगामी काळात सूरज चित्रपटाच्या माध्यमातून मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. राजाराणी असं सूरजच्या चित्रपटाचं नाव आहे. चित्रपटात रोहन मैत्रीची मुख्य भूमिका साकारताना दिसणार आहे.