Shiv Thakare Begging On Street Viral Video Instagram
मनोरंजन बातम्या

शिव ठाकरेवर का आली रस्त्यावर भीक मागण्याची वेळ?; अवतार पाहूनच लोकं घाबरले, Video Viral

Shiv Thakare Prank Viral Video: मराठमोळा अभिनेता आणि ‘बिग बॉस’ फेम शिव ठाकरे सध्या त्याच्या प्रमोशनल ॲक्टिव्हिटीमुळे चर्चेत आला आहे.

Chetan Bodke

Shiv Thakare Begging On Street Viral Video

खरंतर सेलिब्रिटी मंडळी प्रमोशनसाठी आणि चर्चेत राहण्यासाठी कधी काय करतील आणि काय काही करणार याचा काय नेम नाही. नुकतंच मराठमोळा अभिनेता आणि ‘बिग बॉस’ फेम शिव ठाकरे सध्या त्याच्या प्रमोशनल ॲक्टिव्हिटीमुळे चर्चेत आला आहे. नुकतंच अभिनेत्याने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे, त्या व्हिडीओमध्ये तो चाहत्यांसोबत प्रँक करताना दिसतोय. दरम्यान, अभिनेत्याला या विचित्र अवतारामध्ये कोणीही ओळखलेलं नाही. (Bollywood Actor)

शिवने या व्हिडीओमध्ये मुंबईच्या रस्त्यावर चाहत्यांसोबत एक प्रँक केला होता. हा प्रँक करताना, त्याने आपल्याला कोणीही ओळखू नये यासाठी हटके अंदाज केला होता. शिवने या व्हिडीओमध्ये प्रोस्थेटिक मेकअप केलेला होता. हा प्रोस्थेटिक करतानाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. यावेळी शिवच्या चेहऱ्यावर मोठ मोठे फोड, टक्कल आणि विचित्र अवतार पाहायला मिळत आहे. प्रँक करताना जेव्हा तो लोकांसमोर जातो तेव्हा अनेक जण त्याला घाबरतात. मात्र अभिनेत्याला ह्या विद्रूप अवतारामध्ये कोणीही ओळखत नाही. (Viral Video)

सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत असून व्हिडीओची चाहत्यांमध्ये जोरदार चर्चा होत आहे. हा प्रँकचा व्हिडीओ स्वत: शिवने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करताना त्याने 'मस्तीच अंगाशी आली' असं कॅप्शन देत व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये, तो विद्रूप अवतारामध्ये लोकांकडे भीक मागताना दिसत आहे. अशा अवतारात त्याला अनेकांनी हटकलं तर काहीजण त्याला घाबरले. पण एका रिक्षा ड्रायव्हरच्या कृत्याने चाहत्यांचे मन जिंकले. रिक्षावाल्या काकांनी त्याला दया दाखवत पैसे दिल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे. (Shiv Thakare)

या व्हिडीओवर शिव ठाकरेला चाहत्यांकडून खुप चांगल्या पद्धतीने प्रतिसाद मिळतोय. चाहते म्हणतात, "रिक्षा ड्रायव्हर काकांनी चाहत्यांचे मन जिंकले.", " मराठी माणूस कायमच मदत करतो.", "शेवटी मराठी माणूसच मराठी माणसाच्या मदतीला आला" अशा प्रतिक्रिया चाहत्यांनी दिल्या आहेत. शिव ठाकरेच्या या प्रँक व्हिडीओला २४ तासांच्या आतच साडे तीन लाखांहून अधिक लाईक्स मिळाले. (Entertainment News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today Gold Rate: सोनं खरेदी करण्याची सुवर्णसंधी, १० तोळ्याच्या दरात ६००० रुपयांनी घसरण, आजचे दर किती?

Maharashtra Live News Update: संगमनेरमध्ये स्कूल बसला अपघात

Mumbai Police News : आलिशान कारमधून आले अन् टपरी चालकाला उचलून नेलं, मुंबईतील २ पोलिसांना बेड्या

Maharashtra Politics: मीरा-भाईंदरमध्ये भाजपला मोठा धक्का, मराठी पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्याचा मनसेत प्रवेश|VIDEO

Abhijeet Khandkekar Wife: फेसबुकवर मैत्री नंतर लग्न केलं; कोण आहे अभिजीत खांडकेकरची पत्नी?

SCROLL FOR NEXT