Ankita Walawalkar Saam Tv
मनोरंजन बातम्या

Ankita Walawalkar: 'बिग बॉस' फेम कोकण हार्टेड गर्ल लवकरच छोट्या पडद्यावर, मालिकेसाठी लिहलं गाणं

Ankita Walawalkar News : अंकिताने तिच्या इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. झी मराठीच्या नव्या मालिकेसाठी तिनं गाणं लिहलेलं आहे.

Manasvi Choudhary

बिग बॉस मराठी फेम सोशल मिडिया इनफ्ल्युएन्सर अंकिता वालावलकर सध्या कमालीची चर्चेत आहे. कोकण हार्टेड गर्लसाठी २०२४ हे वर्ष अत्यंत खास आहे. सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या अंकिताने नुकतीच नवीन माहिती दिली आहे. अंकिताने नव्या क्षेत्रात पदार्पण केलं आहे. झी मराठीवरील नव्या मालिकेसाठी तिनं गाणं लिहलं आहे. याचदरम्यानची पोस्ट तिने शेअर केली आहे.

अंकिताने तिच्या इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. झी मराठीच्या नव्या मालिकेसाठी तिनं गाणं लिहलेलं आहे. या गाण्याचे बोल तिने चाहत्यांना ऐकवलं आहे. झी मराठीवर २३ डिसेंबरला एक नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेचं शीर्षक गीत अंकिताने लिहलं आहे.

'लक्ष्मी निवास' ही मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या मालिकेत हर्षदा खानविलकर आणि तुषार दळवी यांच्या मध्यवर्ती भूमिका असणार आहेत. या मालिकेच्या माध्यमातून अंकिताने छोट्या पडद्यावर पदार्पण केले आहे. अंकिताने या मालिकेसाठी प्रोमो लिहण्याची संधी मिळाल्याने खूप आनंद झाला असल्याचं म्हटलं आहे.

"झी मराठी वाहिनीवर लवकरच एक नवीन मालिका तुमच्या भेटीला येतेय. या मालिकेचं नाव आहे लक्ष्मी निवास. यासाठी मी गाणं लिहिलंय… मी लिहिलेलं हे पहिलं गाणं हर्षवर्धन वावरे याने गायलं आहे आणि कुणाल-करण यांनी हे गाणं कंपोझ केलंय. लहानपणापासून मला गाण्याची आवड होती आणि या प्रोमोच्या निमित्ताने मी याची सुरुवात केलेली आहे."सोशल मिडियावर अंकिताने शेअर केलेल्या गाण्यावर तिच्या चाहत्याकडून कौतुकाचा वर्षाव सुरू आहे. अनेकांनी तिला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देखील दिल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sanjay Dutt: भारतात पूर्वीसारखी शांतता नाही...; ट्रोल होताच संजय दत्तने दिलं स्पष्टीकरण

भाषा बदलली, गाड्या बदलल्या पण गोधडी नाही! आझाद मैदानाच्या मागे झाल्या सेटिंग, मनोज जरांगेंवर कोणी केला गंभीर आरोप?

रात्री ११ वाजता इन्स्टाग्रामवर आला एक 'व्हिडिओ कॉल' अन् मुंबईतील व्यावसायिकाच्या आयुष्यात वादळ; नक्की काय घडलं?

Maharashtra News Live Update: उजनी धरणावरील खासगी मासेमारी ठेका रद्द, कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या पाठपुराव्याला यश

Curd vs Buttermilk : दही की ताक; रोजच्या आहारात अधिक फायदेशीर काय?

SCROLL FOR NEXT