Kiran Mane Special Post For Irrfan Khan Instagram
मनोरंजन बातम्या

Kiran Mane On Irrfan Khan: ‘बॉलिवूड- हॉलिवूड सकट सगळी दुनिया पागल केलीस...’; इरफान खानसाठी किरण मानेंची खास पोस्ट

Kiran Mane Special Post News: इरफान खान यांचा अभिनय, त्यांचे बोलके डोळे आणि इरफानने केलेला बॉलिवूड ते हॉलिवूड प्रवास, त्यांच्या भूमिकांचा किरण मानेंनी पोस्टमध्ये उल्लेख केला.

Chetan Bodke

Kiran Mane Special Post For Irrfan Khan: ‘बिग बॉस’ फेम अभिनेता किरण माने नेहमीच सोशल मीडियावर कोणत्या ना कोणत्या कारणासाठी तरी का होईना चर्चेत असतात. टेलिव्हिजन सिरियल्समुळे लोकप्रियता मिळालेले किरण माने नेहमीच आपल्या स्पष्टवक्तेपणा साठी चर्चेत असतात.

नेहमीच किरण माने आपल्या पोस्टकरिता चर्चेत असतात. यावेळी किरण मानेंनी दिवंगत बॉलिवूड अभिनेता इरफान खानसाठी एक स्पेशल पोस्ट लिहिली आहे. पोस्टमध्ये अभिनेत्याने इरफान खान यांचा अभिनय, त्यांचे बोलके डोळे आणि इरफानने केलेला बॉलिवूड ते हॉलिवूड प्रवास, त्यांच्या भूमिकांचा किरण मानेंनी पोस्टमध्ये उल्लेख केला.

किरण माने आपल्या पोस्टमध्ये म्हणतात, “भावा, तुझे डोळे... एखाद्या गहिर्‍या डोहासारखे होते रे! आजबी रूतून बसलेत काळजात. आयुष्यभर राहतील तिथंच वस्तीला... तू लहान असताना तुझे वडील तुला पाहुन म्हनायचे “ये ऑंखे नहीं. ‘जाम’ है भरे हुए” उफ्फ्फ ! एक ‘अभिनय’ सोडला तर मला दुनियादारी माहित नाही. त्यामुळे बाकीच्या फकांड्या मारत नाय. अभिनेता म्हणून एकच कळतं... एखादं उत्तम लिहीलेलं ‘कॅरॅक्टर’ नखशिखान्त मुरवून घेनं... भिनवून घेनं...” (Bollywood)

अभिनेता आपल्या पोस्टमध्ये पुढे बोलतो, “ ‘आतल्या’- मनामेंदूतल्या महासागरात चालणार्‍या भरती-ओहोटींसकट देहबोलपर्यंत साकारनं... हे लै लै लै मोठ्ठं- अवाढव्य काम असतं. खायचं काम नाय हे. पण तू? हा एवढा मोठ्ठा अभिनयाचा भव्य हिमनग निव्वळ नुसत्या डोळ्यांवर पेलून धरायचास राव! नादखुळा.. भिरकीट... नुस्त्या नजरेतनं जाळ अन् धूर संगटच काढायचास ! बॉलिवूड- हॉलिवूड सकट सगळी दुनिया पागल केलीस बहाद्दूरा... सगळ्या जगावर गारूड केलं तुझ्या त्या दोन जादूभर्‍या - दर्दभर्‍या डोळ्यांनी ! ‘मकबुल’ असो नायतर ‘मदारी’... ‘पान सिंग तोमर’ असो नायतर ‘पिकू’...” (Bollywood Film)

अभिनेता आपल्या पोस्टमध्ये पुढे बोलतो, “लंचबॉक्स, नेमसेक, लाईफ ऑफ पाय, लाईफ इन मेट्रो, हासिल... तुला मिळालेल्या भुमिकेची अख्ख्खी जिंदगी ‘निचोड’कर तू त्या डोळ्यांत भरायचास आणि आमच्यासमोर आनून ओतायचास... तू अभिनयाबाबतीत सगळ्या जुन्यापान्या जळमटांवरनं झाडू फिरवलास. सगळ्या चौकटींवरनं बुलडोझर फिरवुन चक्काचूर केलास. सगळ्या चाकोर्‍यांवरनं जेसीबी फिरवलास. गांवखेड्यातनं आलेल्या - ‘स्मॉलटाऊन’- साधारन चेहर्‍याच्या पन अभिनयाची अफाट- अचाट ‘पॅशन’ असलेल्या पुढच्या पिढ्यांसाठी तू आता एव्हरेस्टसारखा उभा आहेस... तुझे ते जादूई दोन डोळे या जगात नाहीत पण कुठूनतरी अशा अभिनेत्यांवर नजर ठेवून आहेत... एखाद्या सावलीसारखे...” (Entertainment News)

अभिनेता आपल्या पोस्टच्या शेवटच्या भागात म्हणतो, “इरफान, काल ‘मकबुल’ परत एकदा बघितला... परत एकदा काळजात कालवाकालव झाली... परत एकदा मेंदूतून झिणझिण्या आल्या... तस्साच नखशिखान्त हादरलो... आणि परत एकदा डोळे पाणावले... तुझी लै लै लै आठवण आली. मिस यू. लब्यू भावा” (Movie)

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Assembly Election: बटेंगे तो कटेंगेला भाजपातूनच विरोध; पंकजा मुंडेंनंतर अशोक चव्हाणांचाही विरोध

IND vs AUS: बुमराह बॅटिंगला आला अन् रिषभ गोलंदाजीला; BCCI ने शेअर केला दोघांच्या जुगलबंदीचा VIDEO

Maharashtra News Live Updates: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा कराडमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांकडून निषेध

Assembly Election: बल्लारपूरमध्ये रंगणार तिरंगी लढत; सुधीर मुनगंटीवारांपुढे काँग्रेसच्या संतोष सिंह रावतांचं आव्हान

IND vs SA: निर्णायक सामन्यात टीम इंडियाचा टॉस जिंकत बॅटिंगचा निर्णय; पाहा प्लेइंग 11

SCROLL FOR NEXT