Bigg Boss Marathi Fame Ghanshyam Darode  Saam Tv
मनोरंजन बातम्या

Ghanshyam Darode : बिग बॉसनंतर घनश्याम दरवडेचा फिल्मी प्रवास सूसाट, छोट्या पुढारीला कोणता चित्रपट मिळाला?

Manasvi Choudhary

बिग बॉस मराठी सीझन ५ मध्ये घनश्याम दरोडेचा सहभाग होता. घनश्याम दरवडे बिग बॉसच्या घरातून प्रेक्षकांची मने जिंकली. छोटा पुढारी अशी ओळख असलेला घनश्याम दरवडेचा मनोरंजनसृष्टीतला प्रवास रहस्यमय आहे. चित्रपट आणि शोच्या माध्यमातून घनश्यामने मनोरंजनसृष्टीत पदार्पण केले. आता बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर घनश्याम दरवडे नवीन चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

दमदार स्टारकास्ट असलेला "कर्मयोगी आबासाहेब" हा चित्रपट २५ ऑक्टोबरला मराठी आणि हिंदी भाषेत जगभर प्रदर्शित होत आहे. नुकतंच या चित्रपटाचं पोस्टर सोशल मीडियावर रिलीज झालं आहे. चित्रपटात अनिकेत विश्वासराव, हार्दिक जोशी, देविका दफ्तरदार, पृथ्विक प्रताप, विजय पाटकर, प्रदीप वेलणकर, सुरेश विश्वकर्मा, अरबाज शेख, तानाजी गलगुंडे, घनश्याम दरवडे (छोटा पुढारी), अहमद देशमुख, वृंदा बाळ, निकिता सुखदेव,अली शेख, अल्ताफ दादासाहेब शेख हे मुख्य भूमिकेत आहेत.

वारकरी कुटुंबाची पार्श्वभूमी असलेल्या सर्वसामान्य कुटुंबात जन्माला येऊन सांगोला मतदारसंघातून गणपतराव देशमुख तब्बल ११ वेळा आमदार म्हणून निवडून आले होते. तब्बल ५५ वर्षं त्यांनी या मतदारसंघाचं प्रतिनिधित्वं केलं. स्वर्गीय मा .गणपतराव देशमुख म्हणजेच ऊर्फ आबासाहेब यांचं जीवन आणि कार्य या चित्रपटातून उलगडणार आहे. मायका माऊली फिल्म प्रॉडक्शन आणि मुंबई क्रिएशन एंटरटेन्मेंटच्या मारुती तुळशीराम बनकर, बाळासाहेब महादेव एरंडे यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे. अल्ताफ दादासाहेब शेख यांनी चित्रपटाचं लेखन, गीतलेखन आणि दिग्दर्शन केलं आहे. अवधूत गुप्ते यांनी संगीत, कुमार डोंगरे यांनी छायांकन आणि संकलनाची जबाबदारी निभावली आहे. कुणाल गांजावाला, मनीष राजगिरे यांनी गाणी गायली आहेत. कार्यकारी निर्माता अमजद खान शेख असून प्रोडक्शन कंट्रोल सय्यद दादासो शेख यांनी काम पाहिले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi Classical Language Status : जाहलो खरेच धन्य...! मराठी भाषेला अभिजात दर्जा; केंद्र सरकारचा मोठा निर्णय

Maharashtra Politics: शरद पवारांचा एकाच वेळी भाजप-अजित पवारांना धक्का, डाव टाकताच बडे नेते लागले गळाला!

Marathi News Live Updates : रत्नागिरीतील महिलांना पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडून मोबाईल

Abdul Sattar News : पन्नास खोके एकदम ओके; अब्दुल सत्तारांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी, कुठं घडला प्रकार? VIDEO

Maharashtra Politics: अजित पवार गटाला 40 जागा, शिंदे - भाजप किती जागांवर लढवणार निवडणूक? काय आहे अमित शहांचा फॉर्म्युला? वाचा...

SCROLL FOR NEXT