Famous Actress  AI PHOTO
मनोरंजन बातम्या

Famous Actress : बिग बॉस फेम अभिनेत्रीच्या मुंबईतील घरात ७६ लाखांची चोरी, बिहारमधून आरोपीला अटक

Robbed In Famous Actress Home : प्रसिद्ध अभिनेत्रीच्या घरी चोरी झाल्याची माहिती मिळाली आहे. अभिनेत्रीच्या घरातून मौल्यवान ऐवज चोर पळवून घेऊन गेले.

Shreya Maskar

प्रसिद्ध अभिनेत्रीच्या घरी चोरी

पोलीसांनी आरोपीला पकडले

चोरांनी अभिनेत्रीच्या मुंबईतील घरातून मौल्यवान ऐवज चोरला

साम टिव्ही प्रतिनिधी - संजय गडदे

मनोरंजन विश्वातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध अभिनेत्री आणि 'बिग बॉस' स्पर्धक लोपामुद्रा राऊत यांच्या सांताक्रूझ येथील घरातून सुमारे ७६.३९ लाख रुपयांचा मौल्यवान ऐवज चोरीला गेल्याच भयंकर प्रकार घडला आहे. या प्रकरणाचा सांताक्रूझ पोलिसांनी छडा लावला आहे. या प्रकरणी पोलिसांनी एका आरोपीला बिहारमधील दरभंगा येथून अटक केली असून, त्याच्याकडून सुमारे ५१ लाख रुपयांहून अधिक किमतीचा चोरीचा मुद्देमाल जप्त केल्याचा दावा पोलिसांनी केला आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, जुलै महिन्यात लोपामुद्रा राऊत यांच्या सांताक्रूझ येथील घरात चोरीची घटना घडली. चोरीच्या मुद्देमालामध्ये महागडे घड्याळ, सोन्याचे दोन बिस्कीट, रोकड तसेच अन्य मौल्यवान वस्तूंचा समावेश होता. घटनेच्या वेळी लोपामुद्रा राऊत कामानिमित्त मुंबईबाहेर होती. अभिनेत्री २० जून ते २७ जुलै या कालावधीत शहराबाहेर गेली होती. याच कालावधीत आरोपीने घरात चोरी केल्याचा पोलिसांचा संशय आहे. चोरीची माहिती मिळाल्यानंतर सांताक्रूझ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली.

प्रकरणाचा तपास सुरू असताना पोलिसांनी तांत्रिक माहिती तसेच स्थानिक पातळीवर मिळालेल्या माहितीच्या आधारे आरोपीचा माग काढला. आरोपी बिहारमध्ये असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांचे पथक दरभंगा येथे पोहोचले आणि आरोपीला अटक केली.आरोपीच्या ताब्यातून सुमारे ५१ लाख रुपयांहून अधिक किमतीचा चोरीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सांताक्रूझ पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेने संयुक्तपणे ही कारवाई केली.दरम्यान, या चोरीच्या प्रकरणात आरोपीसोबत आणखी कोणी सहभागी होते का, तसेच उर्वरित चोरीचा मुद्देमाल आणि रक्कम कुठे आहे, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.

लोपामुद्रा राऊत ही प्रसिद्ध अभिनेत्री असून सौंदर्य स्पर्धेची विजेतीही राहिली आहे. सलमान खानच्या 'बिग बॉस' कार्यक्रमामुळे अभिनेत्रीला खूप लोकप्रियता मिळाली. तसेच रोहित शेट्टीच्या 'खतरों के खिलाडी' या शोमध्येही अभिनेत्री झळकली आहे. आपल्या अभिनयाने आणि सौंदर्याने तिने प्रेक्षकांचे मन जिंकले. तसेच अभिनेत्रीने काही वेब मालिकांमध्येही काम केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

भाजप स्वबळावर लढणार, CM फडणवीसांच्या विश्वासू नेत्याचं मोठं विधान

Maharashtra News Live Update: 7 दिवसांच्या गणपती विसर्जनानंतर कोकणवासीयांचा परतीचा प्रवास

लालबागच्या राजाच्या मंडपात अचानक शॉर्टसर्किट; मोठ्या ठिणग्यांनी भाविकांमध्ये घबराट|VIDEO

Maharashtra Politics: काँग्रेसला मोठा हादरा! बडा नेता भाजपच्या वाटेवर; पक्षप्रवेशाची तारीख ठरली

बंद असलेले सर्व कबुतरखाने तातडीने सुरू करा; अन्यथा... जैन मुनींचा विधानसभा अध्यक्षांना इशारा

SCROLL FOR NEXT