Kiran Mane Praised Manoj Jarange Patil Satara Sabha Saam Tv
मनोरंजन बातम्या

Kiran Mane: ‘नितळ, परखड अन् सडेतोड बोलणारा माणूस...’; सातारच्या बच्चनने केले मनोज जरांगे पाटलांचं कौतुक

Kiran Mane Post: जरांगे पाटील यांची साताऱ्यामध्ये सभा झाल्यानंतर अभिनेता किरण मानेने सोशल मीडियावर एक पोस्ट लिहिली आहे.

Chetan Bodke

Kiran Mane Praised Manoj Jarange Patil Satara Sabha

मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलन पुकारले आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला राज्यभरातून चांगला पाठिंबा मिळत आहे. अशामध्ये आता जरांगे पाटील सध्या महाराष्ट्र दौरा करत आहेत.

नुकताच त्यांची साताऱ्यामध्ये जाहीर सभा झाली. या सभेच्या माध्यमातून त्यांनी सातारकरांशी संवाद साधला आणि आरक्षणासाठी लढा देण्याचे आवाहन केले. जरांगे पाटील यांची साताऱ्यामध्ये सभा झाल्यानंतर अभिनेता किरण मानेने सोशल मीडियावर एक पोस्ट लिहिली आहे. या पोस्टमध्ये किरण मानेनी मनोज जरांगे पाटील यांच्या सभेला मिळत असलेल्या प्रतिसादावर भाष्य केले आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचे कौतुक करताना किरण मानेने ही पोस्ट शेअर केली आहे. “जरांगे पाटलांची राजधानी साताऱ्यातली सभा राजासारखी झाली. देखणी, रूबाबदार... मी खेडेगावात लहानाचा मोठा झालोय. राजकीय नेत्यांसाठी सभेला गर्दी जमवणं किती सहजशक्य असतं, हे मी डोळ्यांनी पाहिलंय. कशा जीपा, ट्रक, टेम्पो भरून माणसं सभेला नेली जातात... कशा घोषणा दिल्या जातात. त्यानंतरच्या पार्ट्या, दारू सगळं माहितीय...”

“अशा परिस्थितीत एका सर्वसामान्य माणसाच्या सभेला उत्स्फूर्तपणे, मनापासनं, स्वत:हून घरातनं उठून सभेला जाऊन बसणारी माणसं बघायला मिळताहेत. भर उन्हात, रात्री दोन-दोन वाजेपर्यंत त्याची वाट पहातात. हे कुठल्याही नेत्याला आजच्या काळात शक्य नाही. मी सातारचं जरांगे पाटलांचं भाषण पूर्ण ऐकलं. जेवढ्या तळमळीनं लोक येतात, तेवढ्याच मनापासून, नितळ, स्पष्ट, परखड, सडेतोड बोलणारा आणि वागणारा हा माणूस आहे. आरक्षणाविषयी सगळी कायदेशीर माहीती आहे.” (Social Media)

“आरक्षणाचा लाभ घेणार्‍या इतर वर्गांविषयी जराही कटुता त्यांच्या मनात नाही. द्वेषभावना न पसरवता, ‘इतर जातीजमातींना दुखवू नका. ही नेत्यांनी निर्माण केलेली दुफळी आहे. मनातून आपण सगळे जातीधर्माचे लोक एक आहोत.’ असा सूर भाषणात असतो, जो आश्वासक आहे. संविधान दिन जवळ आलाय. त्याचवेळी एका सामान्य नागरीकाच्या नेतृत्वाखाली, कुठल्याही राजकीय पाठबळाशिवाय, संविधानिक मार्गाने एक भव्यदिव्य आंदोलन उभं रहाणं ही खूप प्रेरणादायी घटना आहे. जय शिवराय... जय भीम.” अशी पोस्ट किरण मानेने चाहत्यांसोबत शेअर केली आहे. (Entertainment News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ajit Pawar Plane Crash: अजित पवार विमान अपघात प्रकरणी सर्वात मोठी कारवाई,DGCA ची व्हीएसआरच्या विमान उड्डाणावर बंदी

Wednesday Horoscope : मनासारखा दिवस जाईल, डोके शांत ठेवून काम कराल; ५ राशींच्या लोकांचं नशीब पालटणार

Digital Arrest: फोन आला, कोणी व्हिडिओ कॉल केला तर काय कराल? मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितला बचावाचा मार्ग

T20 World Cup : झिम्बाब्वेविरुद्धच्या सामन्याआधी मोठी अपडेट, मॅच विनर फलंदाजानं अचानक टीम इंडियाची साथ सोडली, कारण चिंताजनक

Maharashtra Live News Update: विक्रोळीतील महालक्ष्मी डेरीतील ‘माझा’ शीतपेयात आढळला कचरा

SCROLL FOR NEXT