Abdu Rozik  canva
मनोरंजन बातम्या

Abdu Rozik : बिग बॉसमधील अब्दू रोझिकचं लग्न मोडलं, सोशल मीडियावर पोस्ट करत सांगितलं कारण

Abdu Rozik Calls Off Wedding: इंटरनेट सेन्सेशन आणि कझाकिस्तानचा सुप्रसिद्ध गायक अब्दू रोझिक याचे साखरपुड्याच्या सहा महिन्यांनतर लग्न मोडलं आहे.

Saam Tv

बिग बॉस १६मधून लोकप्रसिद्ध झालेला अब्दू रोझिक नेहमीच त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असतो. सध्या सोशल मीडियावर सर्वत्र अब्दूची चर्चा सुरु आहे. बिग बॉसनंतर अब्दूने एप्रिल २०२४मध्ये गूपचूप साखरपुडा केला होता. आता अब्दूचं लग्न मोडल्याची बातमी समोर येत आहे. अब्दूच्या ज्या मुलीसोबत लग्न झालं होतं तिचं नाव अमिरा असं होतं. माझं अमिरासोबत ठरलेलं लग्न मोडलं याबद्दलची माहिती स्वता: अब्दूने दिलं आहे. एका मुलाखाती दरम्यान अब्दूनी चाहत्यांना ही माहिती दिली आहे.

अब्दू सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असतो. काल अब्दूने त्याच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याचं अणि अमिराचं लग्न मोडल्याची चाहत्यांना माहिती दिली आहे. अब्दू त्याच्या व्हिडिओमुळे चाहत्यांमध्ये नेहमीच चर्चेत असतो. चाहते त्याच्या कॉमेडी व्हिडिओला भरपूर पसंती देत असतात. परंतु आता त्याने आयुष्यामध्ये खुप मोठा निर्णय घेतला आहे.

ई टाईम्सच्या रिपोर्ट्सनुसार, अब्दूने स्वता:सांगितले की, "जसं आमचं नातं पुढे चालत होतं तसतसं आम्हाला काही सांस्कृतिक आणि सामाजिक फरकांचा सामना करावा लागत होता. त्यामुळे आम्ही दोघांनी सहमतीने ठरलेलं लग्न मोडल्याचा निर्णय घेतला. खरंतर हा निर्णय घेणं भरपूर आवघड होतं. परंतु नंतर त्रास होण्यापोक्षा सुरुवातीलाच ते थांबवण चांगल असतं." त्यानंतर अब्दू म्हणाला की, तुम्हाला सर्वांना माहितीच आहे की माझ्या कामामध्ये एकदम दृढनिश्चय आहे. त्यामुळे माझ्या दररोजच्या जीवनामध्ये मला अनेक आव्हानांना सामोरं जावं लागतं त्यामुळे मला एका समजूदर जोडीदाराची गरज आहे."

अब्दू आणि अमिराचं लग्नं साखरपुड्याच्या सहा महिन्यांनंतर मोडलं. अब्दू आणि अमिकराचा साखरपुडा शारजाहमध्ये पार पडला होता. अब्दु इंटरनेट सेन्सेशन आणि कझाकिस्तानचा प्रसिद्ध गायक आहे. त्याचे सोशल मीडियावर अनेक फॉलोवर्स आहेत. त्याचे कॉमेडी आणि गाण्यांचे व्हिडिओ चाहत्यांमध्ये प्रसिद्ध आहेत.

Edited By: Nirmiti Rasal

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ज्या मुलाला दत्तक घेतलं, त्याच्याच बायकोनं वृद्ध सासूला मध्यरात्री रस्त्यावर सोडलं

Bike Stunt : 'मौत का कुआ'मध्ये स्टंटबाजी करताना भीषण अपघात, तरुण १५ फूट खाली पडला; घटनेचा थरारक Video Viral

Maharashtra Live News Update: लातूरच्या औसा रुग्णालयाच्या शासकीय रुग्णवाहिकेला भीषण आग

E Sakal: ई सकाळची गरुडझेप! सलग दोन महिने वाचकांची सर्वाधिक पसंती

Tan Removing Tips: पावसाळ्यात त्वचा चिकट अन् काळी पडलीये? टॅनिंग दूर करण्यासाठी 'या' टिप्स करा फॉलो

SCROLL FOR NEXT