Bigg Boss SAAM TV
मनोरंजन बातम्या

मुलगी झाली हो! 'Bigg Boss' फेम कपलच्या घरी चिमुकल्या पाहुण्याचे आगमन, पाहा PHOTO

Prince -Yuvika : बिग बॉस फेम कपल प्रिन्स आणि युविका हे लग्नाच्या सहा वर्षांनंतर आई-बाब झाले आहेत. त्यांचे सुंदर फोटो पाहा.

Shreya Maskar

बिग बॉसच्या (Bigg Boss) घरात अनेक सदस्यांमध्ये प्रेमाची नाती तयार होतात. काहींची घराबाहेर येताच तुटतात तर काहींची आयुष्य भरासाठी एकमेंकाची साथ देतात. असेच एक कपल ज्यांचे बिग बॉसच्या घरात प्रेम जळले आणि आता त्यांनी एका गोंडस बाळाला जन्म दिला आहे. हे कपल दुसरे तिसरे कोणी नसून 'बिग बॉस 9' (Bigg Boss 9) फेम युविका चौधरी आणि प्रिन्स नरुला आहेत.

प्रिन्स (Prince Narula) आणि युविकाच्या (Yuvika Chaudhary) घरी चिमुकल्याचे आगमन झाले आहे. युविकाने एका गोंडस मुलाली जन्म दिला आहे. शनिवारी संध्याकाळी युविकाने आपल्या मुलीला जन्म दिला आहे. प्रिन्स आणि युविकाच्या लग्नाच्या सहा वर्षांनंतर ते आई-बाबा झाले आहे. मीडिया रिपोर्टनुसार, प्रिन्सच्या वडीलांनी ही गोड बातमी दिली आहे आणि आपला आनंद व्यक्त केला आहे.

बिग बॉसच्या घरात युविका आणि प्रिन्सच्या मैत्रीला सुरूवात झाली. पुढे काही काळ ते एकमेंकांना डेट करू लागले. या जोडप्याने 2016 ला साखरपुडा केला. तर 2018 ला ते लग्नबंधनात अडकले.

प्रिन्स नरुला हा 'बिग बॉस 9' चा विजेता झाला होता. तसेच त्यांनी 'रोडीज एक्स 4'ही जिंकले होते. युविका आणि प्रिन्सने डोहाळे जेवणही खूप थाटामाटात पार पडले. त्यांनी खूप सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. सध्या त्यांच्यावर चाहत्यांकडून आणि सेलिब्रिटींकडून प्रेमाचा वर्षाव होत आहे. आता ही दोघ या गोंडस मुलीचे नाव काय ठेवणार याची चाहत्यांना उत्सुकता लागली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

संसदेच्या बाहेर राममंदिरातील 'चंदा चोरी', संसद आवारात अवतरले मंदिरातले साधू

Fact Check: समोसा, जिलेबीवरही आता वॉर्निंगचा स्टॅम्प? समोसा, जिलेबी सिगारेटएवढं धोकादायक?

GEN Z आंदोलकांवर गुन्हे, CJPमध्ये संताप, आंदोलकांवर कारवाईसाठी पोलीस सरसावले, सरकारच्या समर्थनात दिल्ली पोलीस कुटुंबीयांची उडी

पोलिसांची अजब कारवाई, पाटलांचं गजब विधान, 'दगडावरील आंदोलकांच्या बोटांचे ठसे आधारला जोडणार'

भिवंडीत 4 मजली इमारत कोसळली, 10 जणांचे मारेकरी कोण?

SCROLL FOR NEXT