Bigg Boss Couple Love Story : बिग बॉसच्या घरात सूत जुळलं, बाहेर संसार थाटला, या जोडीबद्दल माहिती आहे का ?

Prince And Yuvika Love Story : बिग बॉसच्या घरात अनेक कलाकारांची नाती जुळतात. अशाच एका नात्याची आज सविस्तर लव्ह स्टोरी जाणून घेऊयात.
Prince And Yuvika Love Story
Bigg Boss Couple Love StorySAAM TV
Published On

हिंदी असो वा मराठी बिग बॉसचा मोठा चाहता वर्ग आहे. बिग बॉस घरात काय चालू असते हे पाहण्यासाठी प्रेक्षक आतुर असतात. सध्या बिग बॉस मराठीचा ५ सीझन चालू आहे तर बिग बॉस हिंदीच्या १८ सीझनची तयारी पाहायला मिळत आहे. बिग बॉस घर म्हणजे भांडणे, राडा, स्पर्धेसोबतच नवीन जुळणारी नाती देखील असतात. बिग बॉस घरात खूप वेळासाठी लोक एकत्र राहतात. काही पहिल्यांदा घरात भेटतात तर काहींची आधीच ओळख असते.

आपण बिग बॉसच्या अनेक सीझनमध्ये प्रेम खुलताना पाहिले असेल. यातील काही नाती बिग बॉस घरापर्यंत मर्यादित राहीली, काही बिग बॉस घराबाहेर पडताच तुटली देखील तर काही नाती आयुष्यभरासाठी जोडली गेली. बिग बॉस घरात आयुष्यभरासाठी जुळलेल्या नात्यांची संख्या कमी जरी असली तरी ही प्रेमाची नाती आजवर घट्ट बांधली गेली आहेत. काही जोडप्यांनी बिग बॉस नंतर लग्न देखील केले आणि आता सुखाने आपल आयुष्य जगत आहेत. आज आपण अशाच एका कपल विषयी जाणून घेणार आहोत. ज्यांनी बिग बॉसमुळे आपल प्रेम मिळालं. या जोडीच नाव प्रिन्स नरुला आणि युविका चौधरी आहे. हे इंडस्ट्री मधील प्रसिद्ध जोड्यामध्ये येते.

बिग बॉसच्या घरातील पहिल्या भेटीपासून ते आता आई-बाबा होण्यापर्यंत प्रिन्स नरुला आणि युविका चौधरी यांनी एकमेकांची साथ कधीच सोडली नाही. ही बिग बॉसच्या सर्व सीझन मधील सर्वात लोकप्रिय जोडी आहे. चाहते यांच्यावर नेहमीच प्रेमाचा वर्षाव करत असतात. चाहत्यांनी त्यांचा प्रेमप्रवास खूप जवळून पाहिला आहे. बिग बॉसमधील हे खास कपल आहे ज्यांचे बिग बॉस घरात प्रेम जुळले त्यानंतर त्यांनी लग्न देखील केले आणि आता एका गोंडस बाळाला जन्म देणार आहेत.

प्रिन्स-युविकाची पहिली भेट

प्रिन्स-युविकाची (Yuvika Chaudhary) पहिली भेट बिग बॉस 9च्या घरात झाली. त्यांच्यात हळूहळू छान मैत्री होऊ लागली. बिग बॉस घरात एकमेंकांसोबत वेळ घालवल्यावर प्रिन्सला (Prince Narula) युविका आवडू लागली. तस त्यांने त्याच्या भावना युविकाला सांगितल्या देखील होत्या. बिग बॉस 9 मधील सर्वात अविस्मरणीय क्षण म्हणजे प्रिन्सने युविकाला हार्टच्या आकाराचा पराठा खायला देऊन प्रपोज केला होता. पहिल्यांदा बिग बॉस घरात प्रिन्सने अशाप्रकारे आपल्या भावना युविकापर्यंत पोहचवल्या होत्या.

सर्व सुरळीत चालू असताना अचानक युविकाला बिग बॉस 9 मधून बाहेर जावे लागले. युविकाच्या बिग बॉस (Bigg Boss) सोडण्यामुळे प्रिन्सला खूप दुःख झाले होते. तो गेमसुद्धा नीट खेळत नव्हता. तो खूप भावनिक झाला होता. बिग बॉस घरात प्रिन्सला युविकाची क्षणोक्षणी आठवण येऊ लागली. तो खूप भावनिक झाला. मात्र त्यानंतर काही वेळाने सीझनच्या मध्ये युविका बिग बॉसमध्ये पुन्हा आली. युविका नसताना प्रिन्स आणि बिग बॉसमधील सदस्य नोरा फतेहिश चांगली मैत्री झाली. यामुळे त्यांच्या काही तरी चालू आहे अशा चर्चा देखील सुरू होत्या. मात्र बिग बॉस युविका आणि प्रिन्स आपापसातील गैरसमज मिटवण्याची संधी दिली. तेव्हा प्रिन्स आणि युविका यांनी एकमेकांबद्दल त्यांच्या भावना उघडपणे व्यक्त केल्या. तेव्हापासून त्यांचे नाते घट्ट झाले. तसेच त्यांच्या आयुष्याने एक वेगळे वळण घेतले. शेवटी प्रिन्स नरुला बिग बॉस 9चा विजेता झाला.

प्रिन्स-युविकाने केली नात्याची घोषणा

प्रिन्स-युविकाने आधीपासून आपल्या नात्याविषयी गुप्तता बाळगली होती. 2017 मध्ये त्यांनी 'हॅलो हॅलो' गाण्याचे शूट केले आणि आपले नाते जाहीर देखील केले. गाण्यातील त्यांची केमिस्ट्री आणि कनेक्शन सर्व काही सांगून गेले. त्यांची ऑन-स्क्रीन केमिस्ट्री पाहून चाहत्यांना त्यांचे नाते कनफॉम झाले. त्यांच्या या म्युझिक व्हिडिओने प्रिन्स-युविकाच्या गोड नात्याचा खुलासा केला. त्याच्या या गाण्यातून प्रेमाची झलक प्रेक्षकांना पाहायला मिळाली.

प्रिन्स-युविकाचे लग्न

प्रिन्स नरुला आणि युविका चौधरी यांनी 12 ऑक्टोबर 2018 लग्नगाठ बांधली. लग्नसोहळ्यासाठी युविकाने मरून रंगाचा लेहेंगा तर प्रिन्सने क्रीम आणि गोल्ड शेरवानी परिधान केली होती. दोघेही लग्नात खूपच सुंदर दिसत होते. अनेक सेलिब्रिटींनी त्यांच्या लग्नाला हजेरी लावली होती. युविका ही प्रिन्सपेक्षा मोठी आहे. त्यांच्यात 8 वर्षांचे अंतर आहे.

प्रिन्स-युविका लवकरच आई-बाबा होणार

25 जून 2024 रोजी युविका आणि प्रिन्सने आपली प्रेग्नन्सी चाहत्यांसोबत शेअर केली. लग्नाच्या ६ वर्षानंतर प्रिन्स आणि युविका आई-बाबा होणार आहेत. युविका आपल्या सोशल मीडियावर आपले प्रेग्नन्सीचे फोटोशूटचे सुंदर ग्लो करणारे फोटो शेअर करत असते. ही बातमी देताना युविका आणि प्रिन्सने बाळाचे कपडे आणि खेळणी खरेदी करतानाचा व्हिडिओ शेअर केला आहे. प्रिन्स-युविकाचे चाहते देखील त्यांच्या बाळाची आतुरतेने वाट पाहताना दिसत आहे.

Prince And Yuvika Love Story
Sanjay Leela Bhansali मालामाल, 'लव्ह अँड वॉर'ने रिलीज आधीच २०० कोटी कमावले, पण कसे?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com