Bigg Boss 20 Saam Tv
मनोरंजन बातम्या

Bigg Boss 20: बिग बॉस २०मध्ये सलमान खानचा चढला पारा! स्काउट आणि गुल्लूला सुनावले खडेबोल, लव्ह गिलला अश्रू अनावर

Bigg Boss 20: बिग बॉस २०च्या वीकेंड का वारमध्ये नवा वाद रंगला. सलमान खानने स्काउट ओपी, गुल्लू आणि काझी तौकीरला त्यांच्या वागण्यावरून चांगलेच सुनावले.

Shruti Vilas Kadam

Bigg Boss 20: कलर्स टीव्ही आणि जिओहॉटस्टारवरील लोकप्रिय रिअॅलिटी शो 'बिग बॉस २०'मध्ये दिवसेंदिवस नवनवीन वाद पाहायला मिळत आहेत. घरातील स्पर्धकांमधील भांडणं आता विकोपाला जात असून, त्याचा परिणाम 'वीकेंड का वार'मध्येही पाहायला मिळत आहे. यावेळी सलमान खानने स्काउट ओपी, गुल्लू आणि कनिका मान यांची चांगलीच शाळा घेतली. विशेष म्हणजे, लव्ह गिल आणि स्काउट यांच्यातील वादावरून सलमानने स्काउटला जाब विचारला. त्यामुळे आगामी भागाची चर्चा रंगली आहे.

नेमकं काय घडलं बिग बॉसच्या घरात?

काही दिवसांपूर्वी बिग बॉसच्या घरात स्काउट आणि गुलू यांच्यात लव्ह गिलबद्दल चर्चा झाली होती. यावेळी दोघांनी तिच्याबद्दल काही अपमानास्पद वक्तव्य केल्याचा आरोप आहे. याच मुद्द्यावरून घरात वाद निर्माण झाला. या भागात, सलमान खान हा संपूर्ण विषय घरातील सदस्यांसमोर मांडताना दिसत आहे. सलमानने स्काउट आणि गुलू यांनी केलेल्या वक्तव्यांचा उल्लेख करताच लव्ह गिल भावूक झाली. तिच्या डोळ्यांत अश्रू आले आणि तिने सलमानकडे घरातून बाहेर जाण्याची परवानगी मागितली. मात्र, स्काउटने आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न केला असता सलमानने त्याला थांबवले. या विषयावर चर्चा करायची असेल तर ती लव्हच्या उपस्थितीतच होईल, असं सलमानने स्पष्ट केलं.

सलमान खानने स्काउटला सुनावलं

सलमान स्काउटला थेट प्रश्न विचारताना दिसतो. स्काउट वारंवार स्वतःची बाजू मांडण्याचा प्रयत्न करतो, मात्र सलमान त्याला मध्येच थांबवतो. लव्हला चुकीचं ठरवून स्वतःला योग्य सिद्ध करण्याचा प्रयत्न करत आहेस का, असा सवालही सलमान करतो. इतकंच नाही तर लव्हची इमेज खराब करण्यासाठी असं वक्तव्य केल्याबद्दल सलमान स्काउटला खडेबोल सुनावतो. स्काउटने आरोप नाकारल्यानंतर सलमान आणखी संतापतो. 'हे तू आणि गुल्लू बोलला नाहीस तर मग, मी बोललो आहे का? अशा शब्दांत तो स्काउटला सुनावतो.

कनिका मानलाही सलमानचा सज्जड दम

दुसरीकडे, कनिका मानही सलमानच्या निशाण्यावर आली. काझीसोबत सतत वाद घालणं आणि गुलूसोबत बसून इतर सदस्यांबद्दल चर्चा करणं, याशिवाय तुला दुसरं काही काम नाही का, असा सवाल सलमानने केला. गुलू आणि लव्हसोबत आक्षेपार्ह गप्पा मारताना तुला काही चुकीचं वाटत नाही, मात्र काझीने एखादी छोटी गोष्ट केली तरी तू त्यावर आक्षेप घेतेस, असं म्हणत सलमानने तिची कानउघाडणी केली. दरम्यान, शनिवारचा शेवट, स्काउट, लव्ह आणि कनिका यांच्या वागण्यावर सलमानने उपस्थित केलेल्या प्रश्नांमुळे घरातील वातावरण तापलं आहे. आता या फटकारल्यानंतर तिघेही आपल्या वागण्यात बदल करणार का आणि लव्ह-स्काउटमधील वाद आणखी कोणतं वळण घेणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: धाराशिवमध्ये नांदी साहित्य संमेलनाचा उत्साहात शुभारंभ; ग्रंथदिंडीने वेधले सर्वांचे लक्ष

महिलांसाठी कश्मिरी कानातल्यांचे लेटेस्ट पॅटर्न, 5 डिझाईन्स तुम्हाला नक्की आवडतील

Kitchen Tips : भाज्या आधी धुवाव्यात की कापल्यानंतर? संशोधनातून समोर आली योग्य पद्धत

Delimitation Bill: यांचा विरोध डिलिमिटेशनला नाही तर महिला आरक्षणाला, मुख्यमंत्र्यांचे विरोधकांना प्रत्युत्तर

Breaking News : राजकारणात खळबळ! बड्या नेत्याने सोडली आम आदमी पक्षाची साथ

SCROLL FOR NEXT