'बिग बॉस २०'च्या घरात तिसऱ्या आठवड्याचा कॅप्टन्सी टास्क रंगला.
सदस्यांच्या दोन टीम करण्यात आल्या.
कॅप्टन्सी टास्क दरम्यान घरात जोरदार भांडणे झाली.
'बिग बॉस २०'च्या घरात तिसऱ्या आठवड्याचा कॅप्टन्सी टास्क रंगला आहे. टास्क दरम्यान सर्व स्पर्धकांना दोन गटांमध्ये विभागण्यात आले. काझी आणि यंग डीएसए यांनी आपापल्या टीमचे नेतृत्व केले. कॅप्टन्सी टास्कमध्ये तुफान राडा पाहायला मिळाला. 'बिग बॉस २०'ला प्रेक्षकांकडून भरपूर प्रेम मिळत आहे. घरातील सदस्य प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन देखील करत आहेत.
सोशल मीडिया रिपोर्टनुसार, 'बिग बॉस २०'च्या कॅप्टन्सी टास्कसाठी गार्डन एरिया पाच सर्कलमध्ये विभागण्यात आला होता. प्रत्येक सर्कलमध्ये दोन स्पर्धकांची जोडी होती, तर आसिफ खान याच्याकडे संचालकाची जबाबदारी देण्यात आली होती.टास्कमध्ये लाल आणि हिरवे असे दोन गोलपोस्ट होते. स्पर्धकांच्या फोटोंचे चेंडू गार्डनमध्ये टाकले जात होते. जोडीने आपल्या सर्कलमध्ये राहून चेंडू पकडायचा आणि बझरनंतर तो लाल किंवा हिरव्या गोलपोस्टमध्ये टाकायचा होता. हिरव्या गोलपोस्टमध्ये चेंडू गेल्यास संबंधित स्पर्धक कॅप्टन्सीच्या शर्यतीत पुढे जात होता, तर लाल गोलपोस्टमध्ये चेंडू गेल्यास तो त्या टप्प्यावर बाहेर पडत होता.
पहिल्याच चेंडूवर रीती तिवारी यांचा फोटो आला. माही विजने तो चेंडू पकडून लाल गोलपोस्टमध्ये टाकल्याने रीती कॅप्टन्सीच्या शर्यतीतून बाहेर पडली. यानंतर कॅप्टन्सीसाठी गुल्लू, रिती तिवारी, लवप्रीत गिल आणि मेरी कोम यांच्यात चुरस पाहायला मिळाली. 'बिग बॉस २०' ची माहिती देणाऱ्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्मनुसार, अखेर गुल्लूने (कुशल तन्वर) टास्क जिंकला आणि सलग दुसऱ्यांदा ‘बिग बॉस २०’च्या घराची कॅप्टन्सी मिळवली.
बिग बॉसच्या घरात गुल्लूला सलग दुसऱ्यांदा कॅप्टन्सी मिळाली आहे. दुसऱ्या आठवड्याचा कॅप्टनही गुल्लू होता आणि आता तिसऱ्या आठवड्यातही घरात गुल्लूची सत्ता पाहायला मिळणार आहे. मात्र अद्याप बिग बॉसने गुल्लूच्या कॅप्टन्सीची अधिकृत घोषणा केली नाही. या आठवड्यात कुशल तन्वर आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळे चांगलाच चर्चेत राहिला. 'बिग बॉस २०' जिओ हॉटस्टार पाहायला मिळेल. तसेच कलर्स टीव्हीवर रात्री १०:३० वाजता पाहायला मिळेल.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.