'बिग बॉस २०'चा लवकरच पार पडणार ग्रँड फिनाले
ग्रँड फिनाले तारखेबाबत मोठी अपडेट समोर
'बिग बॉस २०'चा विजेता जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक
सलमान खान होस्ट करत असलेला 'बिग बॉस २०' हा शो सध्या चांगलाच गाजत आहे. सर्वत्र 'वीकेंड का वार'ची चर्चा पाहायला मिळत आहे. अशात आता 'बिग बॉस २०' संबंधित मोठी अपडेट समोर आली आहे. शोच्या ग्रँड फिनालेची माहिती समोर आली आहे. 'बिग बॉस २०' हा शो ६ सप्टेंबर २०२६ ला सुरू झाला आहे. आता शो सुरू होऊन दीड महिना झाला आहे.
tellyexpress च्या रिपोर्टनुसार, 'बिग बॉस २०'चा ग्रँड फिनाले २० डिसेंबर रोजी होणार आहे. मात्र अद्याप शोच्या निर्मात्यांनी फिनालेबाबत कोणतीही अधिकृत माहिती दिली नाही. कोणत्याही तारखेची घोषणा केलेली नाही. नुकत्याच झालेल्या 'वीकेंड का वार'पासून फिनालेबाबत जोरदार चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे. 'वीकेंड का वार'मध्ये रोहित शेट्टीने सांगितले होते की, स्पर्धक त्यांच्या बिग बॉसच्या प्रवासाच्या मध्यावर पोहोचले आहेत. आता, विजेत्याची घोषणा होण्यापूर्वी फक्त आठ आठवडे शिल्लक आहेत. यानंतर, 'बिग बॉस'चा हा सीझन २० डिसेंबरला संपेल अशी अटकळ बांधली जात आहे.
घरात अजूनही १२ स्पर्धक ट्रॉफीसाठी स्पर्धा करताना दिसत आहेत. या यादीत आम्रपाली दुबे, आसिफ खान, अरिशफा खान, कनिका मान, लव गिल, माही विज, मनीष गोयल, काझी तौकीर, स्काउटओपी (तन्मय सिंग), उदिती सिंग, युंग डीएसए आणि गुल्लू (कुशाल तन्वर) यांचा समावेश आहे. माही विज सध्या हाऊस कॅप्टन आहे, तर नकुल धुल्लच्या बाहेर पडल्यानंतर मनीष गोयल हा स्पर्धेतील एकमेव वाइल्डकार्ड राहिला आहे. गेल्या आठवड्यात मेरी कोमने घराचा निरोप घेतला.
'बिग बॉस २०' चा हा आठवडा ड्रामाने भरलेला होता. या वीकेंड का वारमध्ये, रोहित शेट्टीने स्काउट ओपी आणि लव्ह यांच्यातील नात्यावर परखड मत मांडले. यानंतर, स्काउट ओपीची गर्लफ्रेंड काश्वी शोमध्ये आली. काश्वी मोकळेपणाने बोलली, ज्यानंतर स्काउटला आपली चूक लक्षात आली. त्यानंतर लव्हने आपले करिअर खराब केल्याबद्दल स्काउटला दोष दिला. तसेच माही विज आणि आम्रपाली दुबे यांच्यात पुन्हा वाद पाहायला मिळाला.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.