Bigg Boss 20 SAAM TV
मनोरंजन बातम्या

Bigg Boss 20 : बिग बॉसमध्ये मोठा ट्विस्ट! अचानक बाजी पलटली, 'या' स्पर्धकाचा पत्ता कट

Bigg Boss 20 - Elimination : 'बिग बॉस २०'मधून आणखी एका स्पर्धकाचा प्रवास संपणार आहे. या आठवड्यात ११ स्पर्धक नॉमिनेट झाले होते. कोण गेले घराबाहेर, जाणून घेऊयात.

Shreya Maskar

'बिग बॉस २०' च्या या आठवड्यात ११ स्पर्धक नॉमिनेट

अरिशफा खानची १ लाईफलाईन काढली

'वीकेंड का वार'मध्ये सलमान खानने काझीला फटकारले.

सलमान खान होस्ट करत असलेला 'बिग बॉस २०' हा शो दिवसेंदिवस अधिकच रंजक होत जात आहे. पहिल्या दिवसापासूनच या शोने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. या घरात नात्यांची समीकरणे प्रत्येक मिनिटाला बदलताना दिसतात. वाईल्ड कार्ड स्पर्धक नकुल ढुल आणि कुशल तन्वर(गुल्लू) यांच्यातील जोरदार वाद झाला. वादाचे रुपांतर हाणामारीत झाले. त्यानंतर बिग बॉसने एक कठोर निर्णय घेतला आणि नकुलला घरातून बाहेर काढले.

बिग बॉसच्या घरातून आता आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. आणखी एका स्पर्धकाला बाहेर काढण्यात आले आहे. या 'वीकेंड का वार'मध्ये एका स्पर्धकाचा प्रवास संपणार आहे. या आठवड्यात ११ स्पर्धक नॉमिनेट झाले होते. काल घरातील सदस्यांनी किराणा सामानासाठी अरिशफा खानची एक लाईफलाईन काढून घेतली. यामुळे अरिशफा संतापली आणि ती घरातील सदस्यांशी भांडताना दिसली.

सोशल मीडियावर 'बिग बॉस २०'ची माहिती देणारे अनेक अकाउंट , पेज आहेत. त्यांच्या रिपोर्टनुसार, 'बिग बॉस २०'च्या घरातून या आठवड्यात अभिनेता अमन गांधी बाहेर पडणार आहे. मीडिया रिपोर्टनुसार, सर्वात कमी मते मिळाल्यामुळे अमन गांधीला 'बिग बॉस २०' चे घर सोडावे लागले. अद्याप 'बिग बॉस २०' ने कोणतीही अधिकृत घोषणा केली नाही. आज 'वीकेंड का वार'मध्ये सलमान खान याचा खुलासा करेल.

'बिग बॉस २०' च्या घरात १६ स्पर्धकांनी प्रवेश केला आहे. रोहिद खान, ईशा रिखी, रिती तिवारी, नकुल ढुल हे सदस्य घराबाहेर पडले आहेत. या आठवड्यात आम्रपाली दुबे आणि मनीष गोयल वगळता सर्व घरातील सदस्यांना घराबाहेर काढण्यासाठी नॉमिनेट करण्यात आले होते. मनीष नॉमिनेशनच्या शर्यतीतून बाहेर राहिला कारण तो नुकताच शोमध्ये सामील झाला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

कमी बोला, काम जास्त करा" नगराध्यक्षांना उपमुख्यमंत्री शिंदेंचा सज्जड दम

Pune Rickshaw Strike: पुणेकरांनो, रिक्षा बंदचं टेन्शन संपलं! चालक संघटनांनी घेतला मोठा निर्णय

दाजी असावा तर असा! दोन मेहुण्यांना दिले प्रत्येकी 1 कोटींचे हार; लग्नात उडवला पैशांचा धुरळा

देशाचे पुन्हा एकदा विभाजन होणार! ४ प्रांत मोडणार, १५ नवे राज्य होणार? पाकिस्तानात नेमकं काय शिजतंय?

Tuesday Horoscope: आज कोणाला मिळणार यश, कोणाला मिळणार आनंदाची बातमी? जाणून घ्या १२ राशींचे भविष्य

SCROLL FOR NEXT