Bigg Boss 19 SAAM TV
मनोरंजन बातम्या

Bigg Boss 19 : गौरव की शाहबाज नवा कॅप्टन कोण? 'या' सदस्याच्या चुकीमुळे संपूर्ण घर नॉमिनेट

Bigg Boss 19-Nomination : 'बिग बॉस 19'च्या घराचा नवीन कॅप्टन कोण, जाणून घेऊयात. तसेच या आठवड्यात घराबाहेर जाण्यासाठी सर्व सदस्यांना नॉमिनेट करण्यात आले आहे.

Shreya Maskar

घराबाहेर जाण्यासाठी सर्व सदस्यांना नॉमिनेट करण्यात आले आहे.

गौरव खन्ना आणि शाहबाज बदेशा मध्ये कॅप्टन्सी टास्क रंगला.

'बिग बॉस 19' मधून मृदुल तिवारी बाहेर पडला.

'बिग बॉस 19'मध्ये (Bigg Boss 19) नुकताच कॅप्टन्सी टास्क पार पडला आहे. अलिकडेच अभिषेक बजाज आणि नीलम यांना घराबाहेर काढण्यात आले आहे. त्यानंतर मिड-वीक एविक्शनमध्ये मृदुल तिवारी घराबाहेर जातो. 'बिग बॉस 19'चा मास्टर माइंड गौरव खन्ना या आठवड्यात घराचा नवीन कॅप्टन बनतो. कॅप्टन्सी टास्क दरम्यान बिग बॉसमधील सदस्य या आठवड्यात बाहेर जाण्यासाठी नॉमिनेट झाले.

कॅप्टन्सी टास्कमध्ये गौरव खन्ना आणि शाहबाज बदेशा यांना सर्वाधिक मते मिळाली. तेव्हा बिग बॉसने गौरवला कॅप्टन बनण्याचा पर्याय दिला. ज्याच्या बदल्यात संपूर्ण घराला नॉमिनेट केले जाईल आणि 30 टक्के राशन गमवावे लागेल, असे सांगितले गेले. तर शाहबाज कॅप्टन झाला असता तर 100% राशन मिळणार आणि कोणालाही नॉमिनेट केले जाणार नव्हते. त्यानंतर गौरव खन्ना 'बिग बॉस 19'चा नवा कॅप्टन बनला आणि त्याने संपूर्ण घराला नॉमिनेट केले. मात्र त्यानंतर बिग बॉसने गौरवला कॅप्टनशिपवरून काढून टाकले आहे. ज्यामुळे आता संपूर्ण घर नॉमिनेट झाले आहे.

नॉमिनेट सदस्यांची नावे

  • गौरव खन्ना

  • अमाल मलिक

  • फरहाना भट्ट

  • तान्या मित्तल

  • शहबाज बदेशा

  • मालती चहर

  • प्रणित मोरे

  • कुनिका सदानंद

  • अशनूर कौर

'बिग बॉस 19'ची माहिती देणाऱ्या सोशल मिडिया पेजप्रमाणे या आठवड्यात बिग बॉसच्या घरातून अशनूर कौर आणि कुनिका सदानंद बाहेर जाऊ शकतात.

अमाल, फराह आणि कुनिका म्हणाले की, "बिग बॉसने युक्ती खेळली आणि त्यांनी हुशारीने गौरवला कॅप्टन बनवले. " सततच्या आरोपांमुळे बिग बॉस नाराज झाले आणि सर्वांना असेंब्ली रूममध्ये बोलावले. घरातील सदस्यांनी कागदावर मतदान केले आणि घराचा नवा कॅप्टन शेहबाज बनला. त्यामुळे गौरव आता इतर स्पर्धकांसह नॉमिनेट झाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

सोशल मीडियाचे 'स्टार' निवडणुकीत 'गार'; लाईक्स मिळाले पण मतांची बोंब, VIDEO

महापालिकांवर 'GEN Z'चा झेंडा; मुंबई महापालिकेतही घुमणार तरुणाईचा आवाज

Monday Horoscope : कामात धोका पत्करल्यास अडचणी येऊ शकतात; ५ राशींच्या लोकांनी कुटुंबातील सदस्यांची काळजी घ्यावी, अन्यथा...

India vs New Zealand 3rd ODI: विराट कोहलीचं शतक व्यर्थ; टीम इंडियाचा इंदूर वनडेमध्ये दारूण पराभव,न्यूझीलंडने रचला इतिहास

धाड धाड...! मुंबई हादरली, भररस्त्यात तरुणांकडून गोळीबार; नागरिक दहशतीत

SCROLL FOR NEXT