Bigg Boss 19 SAAM TV
मनोरंजन बातम्या

Bigg Boss 19 : प्रणित मोरेचा स्वॅग लय भारी, बनला 'बिग बॉस'च्या घराचा नवा कॅप्टन

Pranit More Captain : मृदुल तिवारीनंतर 'बिग बॉस 19'च्या घराचा नवा कॅप्टन प्रणित मोरे झाला आहे. आता एक आठवडाभर घरात महाराष्ट्रीयन भाऊची सत्ता चालणार आहे.

Shreya Maskar

'बिग बॉस 19'च्या घरात नुकताच कॅप्टन्सी टास्क पार पडला आहे.

प्रणित मोरे 'बिग बॉस 19'च्या घराचा नवा कॅप्टन बनला आहे.

प्रणित मोरेला महाराष्ट्रीयन भाऊ म्हणून ओळखले जाते.

'बिग बॉस 19'मध्ये रोज एक नवीन ड्रामा पाहायला मिळत आहे. नेहल, बसीर अलीच्या एलिमिनेशननंतर घरातील चित्र खूपच बदलले आहे. अभिषेक आणि अशनूरच्या एका चुकीमुळे संपूर्ण घराला नॉमिनेट केले जाते. तर दुसरीकडे प्रणीत मोरे आणि मालती चाहरची मैत्री वाढताना दिसत आहे. प्रेक्षकांना त्यांची केमिस्ट्री खूपच आवडत आहे. नुकताच घरात कॅप्टन्सी टास्क पार पडला आहे.

'बिग बॉस 19'च्या घरीत 'रेशन-कम-कॅप्टन्सी टास्क' रंगला आहे. गार्डन एरियात शहबाज, प्रणित आणि रेशन यांचे तीन वेगवेगळे बोर्ड असतील. या टास्कचे संचालन मृदुल तिवारी करतो. या टास्कमधून घराला नवा कॅप्टन भेटणार आहे. तर रेशन किती मिळणार हे ठरणार आहे. कॅप्टन्सी टास्कमध्ये तीन बॉल असतात. त्यातील एकावर नंबर लिहिलेला असतो. तो बॉल घरातील इतर सदस्यांना पकडायचा असतो. जो हा बॉल पकडेल त्याने ठरवायचे की बॉल कोणाला द्यावा. हा गेममधून शहबाज आणि प्रणितला वगळण्यात आले.

कॅप्टन्सी टास्कच्या शेवटी सर्वांत जास्त पॉइंट्स प्रणितच्या बोर्डवर दिसले. ज्यामुळे महाराष्ट्रीयन भाऊ प्रणित मोरे घराचा नवा कॅप्टन झाला. प्रणितला कॅप्टन होण्यासाठी अभिषेक, अशनूर, मालती, गौरव मदत करतात. आता प्रणित मोरेच्या राज्यात घरात काय काय होते हे पाहणे महत्त्वाचे आहे.

'बिग बॉस 19'चा यंदाचा 'वीकेंड का वार' चांगलाच गाजणार आहे. कारण यात घरातील दोन सदस्य सोडून सर्व स्पर्धकांना नॉमिनेट करण्यात आले आहे. या आठवड्यात कोण घराबाहेर जाणार हे पाहणे मनोरंजक ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Apple कडून मोठा धमाका होणार; नव्या वर्षांत महत्वाची घोषणा करणार

भारतीय क्रिकेटपटूची बहीण लेस्बियन? नेमकं प्रकरण काय? चहर का भडकला?

Pune Navale Bridge Accident: ब्रेक फेल की घातकी ब्रीज? नवले पुलावरील अपघात कशामुळे झाला? दुर्घटनेबाबत RTO चा धक्कादायक अहवाल

Maharashtra Live News Update : नाशिक शहरातील इंदिरानगर बोगदा, मुंबई नाका, द्वारका परिसरात मोठी वाहतूक कोंडी

Surya Gochar 2026: शत्रूच्या राशीत सूर्याचा प्रवेश, २०२६मध्ये ४ राशींची पैशांची तंगी होणार दूर, मिळेल घवघवीत यश

SCROLL FOR NEXT