Bigg Boss 19  saam tv
मनोरंजन बातम्या

Bigg Boss 19 : क्रिकेटपटूच्या बहिणीने तान्या मित्तलच्या कानाखाली मारली? बिग बॉसच्या घरात घडलं काय? पाहा VIDEO

Bigg Boss 19 -Malti Slaps Tanya : 'बिग बॉस 19'मध्ये नुकताच नॉमिनेशन टास्क पार पडला आहे. टास्कमध्ये क्रिकेटपटूची बहिण मालती चाहरने तान्या मित्तलच्या कानाखाली मारली. नेमकं घडलं काय, जाणून घेऊयात.

Shreya Maskar

'बिग बॉस 19' शो शेवटच्या टप्प्यावर आला आहे.

'बिग बॉस 19' मध्ये नुकताच नॉमिनेशन टास्क पार पडला आहे.

नॉमिनेशन टास्कमध्ये मालती चाहर आणि तान्या मित्तलमध्ये मोठा वाद होतो.

सलमान खानचा लोकप्रिय रिॲलिटी शो 'बिग बॉस 19' सध्या चांगला चर्चेत आहे. लवकरच शोचा ग्रँड फिनाले पार पडणार आहे. नुकतीच बिग बॉसच्या घरातून कुनिकाची एक्झिट झाली आहे. कमी मते मिळाल्यामुळे तिला बिग बॉसचे घर सोडावे लागले आहे. आता नवीन आठवड्याला सुरुवात झाली असून नुकताच घरात नॉमिनेशन टास्क पार पडला आहे. ज्यामध्ये मोठा राडा होताना पाहायला मिळाला आहे.

'बिग बॉस 19'ने एक प्रोमो शेअर केला आहे. त्यात घरातील सदस्य नॉमिनेशन टास्क खेळताना दिसत आहे. घरातील सदस्याला ज्याला या आठवड्यात नॉमिनेट करायचे असते. त्यांच्या चेहऱ्यावर नॉमिनेशनचा शिक्का मारायचा होता. तेव्हा फरहानाने गौरव आणि अशनूरवर नॉमिनेशनचा शिक्का मारला. प्रणित मोरेने अमालला नॉमिनेट केले. शहबाजने तान्या मित्तलवर नॉमिनेशनचा शिक्का मारला. तर अमालने गौरवला नॉमिनेट केले. तेव्हा तान्या मित्तल मालती चाहरला नॉमिनेट करते. तिच्या तोंडावर नॉमिनेशनचा शिक्का मारते. यामुळे त्यांच्यात मोठे भांडण होते.

तान्या मित्तलची असभ्यता पाहून नॉमिनेशन टास्क दरम्यान मालती चहर संतापते आणि तिला थप्पडही मारली. तान्या मित्तलने बिग बॉसला सांगितले की, तिला सर्व घरातील सदस्यांना नॉमिनेट करायचे आहे. तान्या मित्तलने मालती चहरच्या ओठांवर नॉमिनेशनचा शिक्का मारते. त्यामुळे रागाच्या भरात मालती तान्याला कानाखाली मारते. मात्र तेव्हा पटकन तान्या मागे हटते. घरातील हा ड्रामा पाहून इतर सदस्यांना मोठा धक्का बसतो. मालती चाहर वाइल्ड कार्ड म्हणून घरात आली तेव्हा तान्या मित्तलचा गेम प्लान उघड झाला. तिने तान्याचे खोटे उघड केले, ज्यामुळे दोघांमध्ये अनेक भांडणे झाली.

तान्या मित्तल आणि मालती चाहरचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. चाहते यावर कमेंट्स करून राग व्यक्त करत आहे. काही लोक तान्या मित्तलच्या वागण्यामुळे मालतीचे समर्थन करत आहेत. तर काही लोक मालती चाहरने तान्या मित्तलच्या थोबाडीत वाजवल्यामुळे तिला ट्रोल करत आहे. आता बिग बॉस पुढे काय निर्णय घेतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. तसेच 'वीकेंड का वार' सलमान खान कोणाची बाजू घेतो, जाणून घेऊयात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tilache Ladoo : हिवाळ्यात तिळगुळाचे लाडू खाण्याचे आरोग्यदायी फायदे, वाचा रेसिपी

Accident : प्रवासी टॅक्सी आणि ट्रकची जोरदार धडक; गाडीचा चक्काचूर; 5 प्रवासी गंभीर जखमी , दोघांची प्रकृती चिंताजनक

Maharashtra Live News Update : कृष्णराज महाडिक घेणार देवेंद्र फडणवीसांची मुलाखत

Actress Assault: प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत रेल्वे स्टेशनवर घृणास्पद कृत्य; दुःख व्यक्त करत म्हणाली, मला जीवन संपवावं...

Parbhani Accident: कीर्तनाहून येताना भयंकर अपघात, ३ वारकर्‍यांचा जागीच मृत्यू, दत्ता महाराज मुडेकरांचं निधन

SCROLL FOR NEXT