बिग बॉसच्या घरात वाईल्ड कार्ड एन्ट्री म्हणून मालती चाहर आली आहे.
मालती घरात येताच तिने तान्या मित्तलला टार्गेट केले.
मालतीचा घरातील गेम कसा असेल यावर नेटकऱ्यांकडून खूप प्रतिक्रिया येत आहेत.
'बिग बॉस 19' च्या (Bigg Boss 19) घरात 'वीकेंड का वार'मध्ये नवीन वाईल्ड कार्ड एन्ट्री झाली आहे. मुंबई इंडियन्सच्या स्टार खेळाडूची बहीण बिग बॉसच्या घरात आली आहे. मालती चाहरच्या (Malti Chahar) 'बिग बॉस 19'मधील एन्ट्रीने घरातील काही सदस्यांना चांगलाच धक्का बसला आहे. घरात प्रवेश केल्यानंतर मालतीने प्रथम तान्या मित्तलला टार्गेट केले. ती अनेकदा घरातील सदस्यांना तान्याविरुद्ध भडकवताना, तिच्याबद्दल बोलताना दिसली.
घरात आल्याच्या पहिल्या दिवसापासून मालती 'बिग बॉस 19'मध्ये आपले स्थान निर्माण करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. मालती चाहरच्या बिग बॉसमधील एन्ट्रीनंतर प्रेक्षकांची संमिश्र मते येऊ लागली आहेत. बिग बॉस या शोची माहिती देणारे सोशल मीडियावर अनेक पेज आहेत. ज्यात प्रेक्षक आपली मते देतात. एकीकडे नेटकरी मालतीचा गेम प्लान सांगत आहे. तर दुसरीकडे तिचे कौतुक करताना दिसत आहेत.
प्रेक्षकांच्या मते मालती चाहर बिग बॉसच्या घरात राडा घालणार आहे. "पहिल्या एपिसोडमध्ये तान्या मित्तलचा पर्दाफाश", "ही मुलगी शोमध्ये धुमाकूळ घालणार", "मालतीच्या येण्याने तान्या अस्वस्थ" अशा अनेक कमेंट्स येत आहेत.
कमेंटमध्ये एका युजरने लिहिलं की, "मालती चाहर घरातील स्ट्राँग सदस्यांना टार्गेट करून काहीतरी ड्रामा करेल. तिने एका टास्कमध्ये अभिषेक बजाजवर हल्ला केला. " नेटकऱ्यांनी मालती चाहरची तुलना नेहलसोबत केली आहे. तसेच काही लोक बोलतात की, मालतीला अमाल मलिकसोबत चांगली मैत्री करायची आहे. तसेच ती शो मध्ये अभिषेक बजाजच्या विरोधात दिसणार असल्याचे बोले जात आहे. मालतीला घरात येऊन फक्त एक दिवस झाला असून तिने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे.
अमाल मलिकचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यात तो बॉटल भरली जाणाऱ्या नळीतून थेट पाणी पिताना दिसत आहे. तर ते पाणी त्याने सिंकमध्ये थुंकले आहे. ज्यामुळे तो प्रचंड ट्रोल होत आहे. पाणी प्यायल्यावर तोंड लावलेली नळी स्वच्छ न करता तिथून निघून जातो. त्याच्या या वागण्यामुळे त्याचे चाहते नाराज झाले असून त्याच्यावर टीका करत आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.