Bigg Boss 19 saam tv
मनोरंजन बातम्या

Bigg Boss 19 : "या स्पर्धकापासून दूर राहा"; मास्टरमाइंड गौरव खन्नाला बायकोने दिला सल्ला, पाहा VIDEO

Bigg Boss 19-Gaurav khanna Wife Advice : फॅमिली वीकमध्ये गौरव खन्नाच्या बायकोची धमाकेदार एन्ट्री झाली. आकांक्षाने गौरव खन्नाला घरातील एका सदस्यापासून दूर राहण्याचा सल्ला दिला.

Shreya Maskar

'बिग बॉस 19' च्या घरात फॅमिली वीक सुरू आहे.

फॅमिली वीकमध्ये गौरव खन्नाची बायको घरात येते.

आकांक्षा गौरवला खेळाबद्दल महत्त्वाचा सल्ला देते.

'बिग बॉस 19' च्या घरात फॅमिली वीक सुरू आहे. घरातीस सदस्य आपल्या कुटुंबाला पाहून भावुक झाले. तसेच सर्वजण मजा-मस्ती करताना घरात दिसत आहे. अशनूर कौरचे वडील, कुनिका सदानंदचा मुलगा, अमाल मलिकचा भाऊ अरमान मलिक, फरहाना भट्टची आई बिग बॉसच्या घरात आले. त्यामुळे घरात आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले.

कुटुंबातील सदस्यांना पाहून गौरव खन्ना देखील बायकोची आतुरतेने वाट पाहत होता. अखेर गौरव खन्नाची बायको आकांक्षा घरात येते. तिला पाहून गौरव खूप भावनिक होतो. तसेच त्यांचा रोमँटिक अंदाज घरात पाहायला मिळाला. आकांक्षाने जाताना गौरवला खेळाबद्दल काही महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या. तिने घरातील एका सदस्यापासून गौरवला लांब राहायला सांगितले.

आकांक्षाने गौरवला स्वतःसाठी खेळण्याचा आणि थोडे स्वार्थी राहण्याचा सल्ला दिला. आकांक्षाने गौरवला त्याची स्पर्धात्मक वृत्ती ठेवायला सांगितले. त्याच्या चांगल्या खेळण्याचे कौतुक केले. तसेच गेमवर लक्ष केंद्रित करायला सांगितले. आकांक्षाने अंतिम फेरीत गौरवच्या सर्वात मोठ्या स्पर्धकांबद्दल सांगितले. ती म्हणाली, अमाल मलिक आणि फरहाना भट्ट तुला अंतिम फेरीत टक्कर देऊ शकतात. ते तुझ्याबद्दल पाठीमागे वाईट बोलतात. त्यामुळे तू फरहाना भट्टपासून दूर रहा.

आकांक्षा आणि गौरवचा रोमान्स पाहून अमाल मलिक डोळे बंद करतो. गौरव आणि आकांक्षाची केमिस्ट्री चाहत्यांना नक्कीच खास वाटली. फरहानाच्या आईने आल्यावर प्रथम गौरव खन्नाचे आभार मानले, कारण त्याच्यामुळे फरहानाला दुसरी संधी मिळाली आणि ती गेम दाखवू शकली. आता फॅमिली वीकमध्ये पुढे काय होणार हे पाहणे मनोरंजक ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मावळमध्ये ५ वर्षीय मुलींवर बलात्कार करून खून, आरोपी पोलिसांच्या ताब्यात

90 च्या दशकातील WWE सुपरस्टार निवृत्त; शेवटचा सामन्यात पराभव पत्कारला; Emotional व्हिडिओ व्हायरल

Hans MalavyaRajyog: नव्या वर्षात 'या' राशींचे जातक होणार मालमाल; हंस-मालव्य राजयोगानं येणार श्रीमंत होण्याचे योग्य

Methi Bhaji Recipe: सर्वांच्या आवीडीची मेथी, भाजीच नाही तर हे ५ पदार्थ आहेत प्रसिद्ध

Besan Burfi Recipe: रोज गोड खाण्याची इच्छा होते? मग एकदाच बनवा टेस्टी हॉटेल स्टाईल बेसन बर्फी, १५ दिवस राहिलं फ्रेश

SCROLL FOR NEXT