Bigg Boss 19 SAAM TV
मनोरंजन बातम्या

'Bigg Boss 19'च्या घरात झाले शॉकिंग एलिमिनेशन, 'या' सदस्याचा प्रवास संपला

Bigg Boss 19 Update : बिग बॉसच्या घरातून आणखी एका सदस्याचा पत्ता कट झाला आहे. सर्वात कमी मते मिळाल्यामुळे घरातील 'या' सदस्याचा प्रवास संपला आहे.

Shreya Maskar

'बिग बॉस 19' च्या घरात तिसरे एलिमिनेशन पार पडले आहे.

'बिग बॉस 19'च्या घरात 'वीकेंड का वार'मध्ये गौहर खान आली.

सलमान खानने 'वीकेंड का वार'मध्ये अमाल मलिकची शाळा घेतली.

'बिग बॉस 19'च्या (Bigg Boss 19) घरात रोज एक नवीन ड्रामा पाहायला मिळत आहे. काल घरात 'वीकेंड का वार' चांगलाच रंगला. हा 'वीकेंड का वार' सलमान खानने होस्ट केला. मात्र सदस्यांची शाळा घेताना आणि त्यांचे कौतुक करताना 'बिग बॉस 7'गौहर खान देखील दिसली. गेल्या आठवड्यात नेहलला शोमधून बाहेर काढू सिक्रेट रूमध्ये ठेवण्यात आले होते. मात्र या आठवड्यात एलिमिनेशन पार पडले आहे.

'बिग बॉस 19'च्या घरातून आता पर्यंत दोन सदस्यांचा पत्ता कट झाला आहे. यात नतालिया जानोस्जेक आणि नगमा मिरजकर यांचा समावेश होता. अशात घरातून अजून एक तिसरा सदस्य बाहेर पडला आहे. ज्याचे नाव वाचून तुम्हाला मोठा धक्का बसेल. या आठवड्यात सहा सदस्य नॉमिनेट झाले होते. यात नीलम गिरी, अशनूर कौर,आवेज दरबार (Awez Darbar) , प्रणित मोरे, मृदुल तिवारी आणि गौरव खन्ना यांचा समावेश होता.

मीडिया रिपोर्टनुसार, या आठवड्यात 'बिग बॉस 19'च्या घरातून इन्फ्लुएंसर आणि डान्सर आवेज दरबारचा पत्ता कट झाला आहे. प्रेक्षकांकडून कमी मते मिळाल्यामुळे आवेजला घराबाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. आता 'बिग बॉस 19'च्या घरातून या आठवड्यात आणखी एक सदस्याचा पत्ता कट होणार असल्याची चर्चा सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे. यात नीलम गिरी आणि प्रणित मोरेचे नाव प्रामुख्याने समोर येत आहे.

गौहर खानची एन्ट्री

गौहर खानने आवेज दरबारला स्वतःसाठी योग्य ठिकाणी बोलण्याचा सल्ला दिला. तसेच अमाल मलिकला घरात भांडताना आणि वावरताना शब्दांचा वापर जपून कर असे सांगितले. तर सलमान खानने बसीर अली, अमाल मलिक यांचे प्रणित मोरेसोबत जे भांडण झाले त्यावर अमाल आणि बसीरला सुनावले. अमाल मलिकने भांडणाच्या वेळी प्रणितला वारंवार ढकलून भडकवण्याचा प्रयत्न केल्यामुळे सलमान खानने त्याला चांगले फटकारले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Land Calcualtion: आता शेतजमीनीची मोजणी फक्त २०० रुपयात होणार; राज्य सरकारचा मोठा निर्णय

Maharashtra Live News Update : नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून ४० स्टार प्रचारकांची यादी जाहीर

मोठी बातमी! शिवसेना शिंदे गट अन् राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट एकत्र, सोलापुरातील राजकारण फिरणार

Chinmayee Sumeet : "होय मी जयभीमवाली..."; चिन्मयी सुमितचं बेधडक वक्तव्य

Shivani Rangole Photos: शिवानीचं मराठमोळं सौंदर्य! जांंभळ्या साडीत दिसतेय खूपच भारी

SCROLL FOR NEXT