Bigg Boss 19 Grand Finale  SAAM TV
मनोरंजन बातम्या

Bigg Boss 19 Grand Finale : शॉकिंग एविक्शन! प्रणित मोरेची ट्रॉफी जिंकण्याची संधी हुकली, बिग बॉसनं दाखवला बाहेरचा रस्ता

Bigg Boss 19 Grand Finale Elimination : 'बिग बॉस १९'चा ग्रँड फिनाले शेवटच्या टप्प्यावर आला आहे. बिग बॉसच्या घरातून प्रणित मोरेची एक्झिट झाली आहे. बिग बॉसला 'टॉप 2' स्पर्धक भेटले आहेत.

Shreya Maskar

'बिग बॉस १९'चा ग्रँड फिनाले चांगलाच रंगला आहे.

ग्रँड फिनालेला घरातील सदस्यांनी चांगलाच धुमाकूळ घातला.

'बिग बॉस १९' मधून प्रणित मोरेची एक्झिट झाली आहे.

'बिग बॉस 19'ची (Bigg Boss 19 Grand Finale) धमाकेदार सुरुवात झाली. सलमान खानचा डान्स पाहून चाहते खुश झाले. ग्रँड फिनालेला अभिषेक बजाज आणि अशनूरचा रोमँटिक डान्स पाहायला मिळाला. तर कुनिका, फरहाना, नेहलच्या कातिल अदा पाहून चाहते घायाळ झाले. अमाल मिलकने आपल्या सुरेल आवाजाने ग्रँड फिनालेची रंगत वाढवली. 'बिग बॉस 19'च्या संपूर्ण प्रवासात प्रणित मोरेच्या स्टँडअप कॉमेडीने खूप हसवले. ग्रँड फिनालेला गौरव खन्नाचा वेगळाच थाट पाहायला मिळाला. गेली तीन महिने हे स्पर्धक प्रेक्षकांचे मनोरंजन करत होते.

'बिग बॉस 19'च्या घरातून आतापर्यंत तीन सदस्यांनी निरोप घेतला आहे. यात पहिल्या नंबरवर गायक अमाल मलिक आणि दुसऱ्या नंबरवर तान्या मित्तल आहे. टॉप 3 मध्ये गौरव खन्ना, प्रणित मोरे आणि फरहाना भट्ट आले. त्यानंतर 'बिग बॉस 19'च्या घरातून प्रणित मोरेची एक्झिट झाली आहे. आता टॉप 2 मध्ये गौरव खन्ना, फरहाना भट्ट हे सदस्य उरले आहेत. महाराष्ट्रातून प्रणित मोरेला खूप प्रेम मिळाले.

बिग बॉस टॉप 2 स्पर्धक

'बिग बॉस 19' च्या घरातील सदस्य

'बिग बॉस 19' च्या घरात एक 16 सदस्य होते. तान्या मित्तल, गौरव खन्ना, प्रणित मोरे, फरहाना भट्ट, अमाल मलिक, अशनूर कौर, झिशान कादरी, अवेज़ दरबार, नगमा मिरजकर, नेहल चुडासामा, बसीर अली, अभिषेक बजाज, नतालिया जानोस्झेक, नीलम गिरी, कुनिका सदानंद, मृदुल तिवारी या कलाकारांचा समावेश होता. तर या स्पर्धेत दोन वाइल्ड कार्ड स्पर्धक देखील आले. ज्यांची नावे शहबाज बदेशा आणि मालती चाहर आहे.

हिंदी 'बिग बॉस सीझन 19' नंतर आता 'मराठी बिग बॉस सीझन 6' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सीझनचे होस्टिंग बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुख करणार आहे. चाहते या सीझनसाठी खूपच उत्सुक असल्याचे पाहायला मिळत आहे.'बिग बॉस 19'ची ट्रॉफी कोण उचलणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Actor Problem: 'त्या भूमिकेमुळे सरळ उभं राहता येत नाही...'; 'तारक मेहता' फेम अभिनेत्याचा धक्कादायक खुलासा

Gaurav - Akanksha : घटस्फोटाच्या चर्चेदरम्यान गौरव खन्नाची Lock Upp 2 मध्ये एन्ट्री, नवऱ्याला पाहून आकांक्षानं असं काही केलं की VIDEO पाहून तुम्हालाही बसेल धक्का

Monsoon Tips: पावसात एका सेंकदात कपडे सुकवायचे असतील तर 'हे Magical Gadgets' करतील मदत

पंढरीच्या वारीची सुरूवात पहिल्यांदा कोणी केली?| Pandharpur Wari

EPFO 3.0 : PF खातेधारकांसाठी महत्त्वाची बातमी! PF काढण्यापूर्वी 'या' गोष्टी तपासा, नाहीतर क्लेम होईल रिजेक्ट

SCROLL FOR NEXT