Bigg Boss 19 saam tv
मनोरंजन बातम्या

तारीख ठरली! 'Bigg Boss 19'चा ग्रँड फिनाले 'या' दिवशी होणार, टॉप 5 फायनलिस्ट कोण?

Bigg Boss 19 Grand Finale : 'बिग बॉस 19' च्या ग्रँड फिनालेची तारीख समोर आली आहे. तसेच टॉप 5 फायनलिस्ट कोण असणार याची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे.

Shreya Maskar

सलमान खानचा 'बिग बॉस 19' शो शेवटच्या टप्प्यात आला आहे.

'बिग बॉस 19'च्या ग्रँड फिनालेची तारीख समोर आली आहे.

'बिग बॉस 19'च्या टॉप 5 फायनलिस्टची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे.

'बिग बॉस 19' मध्ये (Bigg Boss 19) सध्या रंजक वळण आले आहे. बसीर अलीच्या शोमधील एक्झिटनंतर घरात नॉमिनेशचा वाद सुरू झाला. 'बिग बॉस 19' मध्ये रोज नवीन भांडणे आणि राडा पाहायला मिळतो. या शो चा टीआरपी दिवसेंदिवस वाढताना पाहायला मिळत आहे. अशात 'बिग बॉस 19'च्या ग्रँड फिनाले बद्दल मोठी अपडेट समोर आली आहे. 'बिग बॉस 19'च्या ग्रँड फिनालेची तारीख निश्चित करण्यात आली आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, 'बिग बॉस 19'चा ग्रँड फिनाले 7 डिसेंबर 2025 ला होणार असल्याचे बोले जात आहे. मात्र अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आली नाही आहे. 7 डिसेंबर रविवारी 6 वाजता 'बिग बॉस 19' चा ग्रँड फिनाले सुरू होईल. जो ओटीटी प्लॅटफॉर्म जिओ हॉटस्टार आणि कलर्स टिव्हीवर पाहायला मिळेल. नेहमीप्रमाणे रात्री 12 वाजता 'बिग बॉस 19'चा विजेता घोषित केला जाईल.

सोशल मीडियावर जशी 'बिग बॉस 19' च्या ग्रँड फिनालेची तारीख व्हायरल होत आहे. त्याच प्रमाणे टॉप 5 स्पर्धकांची यादी देखील समोर आली आहे. या यादीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. 'बिग बॉस 19' च्या टॉप 5 स्पर्धकांची नावे जाणून घेऊयात, जी सोशल मीडियावर ट्रेंड करत आहेत. टॉप 5 स्पर्धकां

टॉप 5 स्पर्धक

  1. तान्या मित्तल

  2. फरहाना भट्ट

  3. गौरव खन्ना

  4. मृदुल तिवारी

  5. अमाल मलिक

'बिग बॉस 19' चा ग्रँड प्रीमियर 24 ऑगस्ट 2025 ला थाटामाटात पार पडला. या शोमध्ये 17 स्पर्धक सहभागी झाले होते. आतापर्यंत बिग बॉसच्या घरातून आवेज दरबार, नगमा मिरजकर, बसीर अली, झिशान कादरी, नेहल आणि नतालिया हे सदस्या बाहेर गेले आहेत. आता येणार 'वीकेंड का वार'ला कोण घराबाहेर जाणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मोठी बातमी! ठाकरेंनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट; राज्याचा राजकारणाला हादरा

अजित पवार विमान अपघाताला नवं वळण; रोहित पवारांचा मोठा गौप्यस्फोट

Maharashtra Live News Update: पुण्यातील नवले पुलावर अपघातमुळे मोठी वाहतूक कोंडी

Ajit Pawar Death: अजितदादांच्या अपघाताची निष्पक्ष चौकशी करा, जय पवारांची मोठी मागणी

Bhiwandi Crime: उपमुख्यमंत्र्यांची भेट करून देतो म्हणून लॉजवर नेलं; सेना कार्यकर्त्याचा महिलेवर अत्याचार

SCROLL FOR NEXT