'बिग बॉस 19' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
चाहते बॉलिवूड अभिनेता सलमान खानला पुन्हा 'बिग बॉस' च्या स्टेजवर पाहण्यासाठी उत्सुक आहेत.
'बिग बॉस 19'चा लोगो बदलण्यात आला आहे.
बॉलिवूड अभिनेता सलमान खान सध्या 'बिग बॉस 19'मुळे चांगलाच चर्चेत आहे. लवकरच 'बिग बॉस 19' (Bigg Boss 19 ) प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चाहते शोसाठी खूप उत्सुक असल्याचे पाहायला मिळत आहे. नुकताच शोच्या निर्मात्यांनी 'बिग बॉस' ची एक झलक दाखवली आहे. यात यंदाचा 'बिग बॉस' चा डोळा थोडा हटके दिसत आहे. 'बिग बॉस'चा आयकॉनिक 'आय' बदलण्यात आला आहे. ज्याची झलक नुकत्याच रिलीज करण्यात आलेल्या व्हिडीओत दिसत आहे.
'बिग बॉस'चा नवीन लोगो खूपच आकर्षित दिसत आहे. डोळ्यात निळ्या आणि पांढऱ्या रंगाच्या छटांमध्ये बोल्ड दिसत आहेत. तर डोळ्याच्या बुबुळामध्ये रंगीबेरंगी छोटे त्रिकोण दिसत आहे. या नवीन डोळ्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. आता 'बिग बॉस'च्या डोळ्यातील ट्विस्ट शोमध्ये कोणते वळण घेऊ येणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. ऑगस्ट महिन्यात 'बिग बॉस' प्रीमियर आहे. यंदाचेही 'बिग बॉस' बॉलिवूडचा भाईजान सलमान खान (salman khan) होस्ट करत आहे.
'बिग बॉस'च्या नवीन लोगोच्या पोस्टला एक हटके कॅप्शन देण्यात आले आहे. कॅप्शनमध्ये लिहिलं की, "काउंटडाउन हो गया है शुरू, लवकरच होणार अनलॉक..." या पोस्टवर चाहत्यांकडून कमेंट्सचा वर्षाव होत आहे. 'बिग बॉस'च्या लोगोतील बदलामुळे चाहते शोसाठी खूपच उत्सुक असल्याचे दिसत आहेत. मीडिया रिपोर्टनुसार, 'बिग बॉस 19'मध्ये आर्टिफिशियल इंटेलिजेन्स (एआय) महत्त्वाचा भाग असणार आहे. शोच्या फॉरमॅटमध्येही मोठा बदल झालेला दिसणार आहे. मीडिया रिपोर्टनुसार, कोणते कलाकार 'बिग बॉस 19'मध्ये पाहायला मिळणार जाणून घेऊयात.
राम कपूर आणि गौतमी कपूर
अलिशा पनवार
कृष्णा श्रॉफ
धीरज धुपर
राज कुंद्रा
अनिता हसनंदानी
मुनमुन दत्ता
गौरव तनेजा
कनिका मान
अपूर्व मुखिजा
डेझी शाह
मिस्टर फैसू
खुशी दुबे
अर्शिफा खान
तनुश्री दत्ता
शरद मल्होत्रा
ममता कुलकर्णी
पारस काळनावत
मिकी
मीडिया रिपोर्टनुसार, 'बिग बॉस 19' हा आतापर्यंतचा सर्वात मोठा सीझन असणार आहे. 'बिग बॉस 19' सलमान खान पहिले तीन महिने होस्ट करेल. त्यानंतर फराह खान, करण जोहर किंवा अनिल कपूर शोचे होस्ट होतील. मात्र अद्याप याबाबत कोणीतीही अधिकृत घोषणा झाली नाही आहे.
'बिग बॉस 19' कधीपासून सुरू होणार?
ऑगस्ट
'बिग बॉस 19' होस्टिंग कोण करणार?
सलमान खान
'बिग बॉस 19' कोणता बदल करण्यात आला आहे?
'बिग बॉस 19'चा लोगो बदलला
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.