Don 3 : 'बिग बॉस'च्या विजेत्याला लागली लॉटरी? रणवीर सिंहच्या 'डॉन 3'मध्ये झळकणार

Don 3 Update: बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंहच्या 'डॉन 3' चित्रपटासंबंधी मोठे अपडेट समोर आले आहेत. या चित्रपटात 'बिग बॉस'च्या विजेत्याची धमाकेदार एन्ट्री होणार आहे.
Don 3 Update
Don 3SAAM TV
Published On

बॉलिवूडचा सुपरस्टार रणवीर सिंह (Ranveer Singh) सध्या त्याच्या 'धुरंधर' चित्रपटामुळे चांगलाच चर्चेत आहे. 'धुरंधर' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तर दुसरीकडे रणवीर सिंह 'डॉन 3'मध्ये झळकणार आहे. लवकरच 'डॉन 3'चे शूटिंग सुरू होणार असल्याचे बोले जात आहे. या चित्रपटा संबंधित मोठी अपडेट आता समोर आली आहे.

'डॉन 3'मध्ये खलनायकाच्या भूमिकेत सर्वप्रथम विक्रांत मेस्सीला ऑफर देण्यात आली होती. मात्र काही कारणास्थव त्याने ती नाकारली. आता त्याच्या जागी बिग बॉस फेम अभिनेत्याला 'डॉन 3'मध्ये खलनायकाच्या भूमिकेसाठी विचारण्यात आल्याचे बोले जात आहे. मीडिया रिपोर्टनुसार, 'डॉन 3'च्या मेकर्सने खलनायकाच्या भूमिकेसाठी 'बिग बॉस 18'चा विजेता करणवीर मेहराला (Karan Veer Mehra) ऑफर दिली आहे. मात्र याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आला नाही आहे.

'डॉन 3'मध्ये रणवीर सिंहसोबत कियारा अडवाणी झळकणार आहे. तसेच चित्रपटाचे दिग्दर्शन फरहान अख्तर करत आहे. 'डॉन 3'बाबत जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. 'डॉन 3' हा शाहरुख खानच्या 'डॉन' चित्रपटाचा सीक्वल आहे.

करणवीर मेहरा वर्कफ्रंट

करणवीर मेहराला 'बिग बॉस 18' मुळे खूप लोकप्रियता मिळाली. त्याने अनेक मालिकांमध्ये आणि रिअ‍ॅलिटी शोमध्ये काम केले आहे. 'बिग बॉस 18'जिंकल्यानंतर करणवीर मेहरा 'खतरो के खिलाडी 14' चा देखील विजेता ठरला आहे. ज्यामुळे त्यांच्या प्रसिद्धीत भर पडली आहे.

Don 3 Update
Amitabh Bachchan : व्हिडीओ काढणाऱ्या पापाराझींवर अमिताभ बच्चन भडकले, नेमकं घडलं काय?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com