Shruti Vilas Kadam
रणवीर सिंगच्या मुख्य भूमिकेतील 'डॉन ३' मध्ये आता शाहरुख खान आणि प्रियांका चोप्रा पुन्हा दिसणार असल्याची चर्चा रंगली आहे.
‘डॉन’ आणि ‘डॉन २’ मध्ये डॉनची भूमिका साकारणाऱ्या शाहरुख खानची विशेष कॅमिओ किंवा फ्लॅशबॅक सीनमध्ये झलक दिसण्याची शक्यता आहे.
रोमाच्या भूमिकेतील प्रियांका चोप्रा पुन्हा एका अॅक्शन सीनमध्ये झळकणार असल्याचं बोललं जात आहे.
शाहरुखच्या तुलनेत अधिक अॅग्रेसिव्ह आणि मॉडर्न स्टाईलमध्ये रणवीरचा डॉन अवतार प्रेक्षकांसमोर येणार आहे.
'डॉन ३' मधून फरहान अख्तर पुन्हा दिग्दर्शनाकडे वळत असून, तो या चित्रपटाला एक वेगळा आणि थरारक टच देणार आहे.
कथानक नव्याने मांडले जाईल की 'डॉन २' च्या पुढे सुरु होईल, यावर सस्पेन्स कायम आहे.
शाहरुख, प्रियंका आणि रणवीर या त्रिकूटाच्या कॉम्बिनेशनमुळे ‘डॉन ३’ ची उत्सुकता आणखी वाढली आहे.