ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
अरेबिक डिझाईन्स सुलभ, सुंदर आणि झटपट तयार होणारे असतात. त्यात फुलांचे व बेलांचे नाजूक नमुने हातांचे सौंदर्य खुलवतात.
केवळ बोटांवर लक्ष केंद्रित करणारी ही डिझाईन ट्रेंडी आणि युनिक आहे, खास करून कॉलेज युवतींसाठी आकर्षक.
निसर्गाशी संबंधित फुलं, पाने आणि वेलींच्या डिझाईन्स श्रावणाच्या हिरवाईशी जुळणाऱ्या आणि उठून दिसणाऱ्या असतात.
गोलाकार रचना असलेल्या मंडाला डिझाईन्स हातांना पारंपरिक व आध्यात्मिक स्पर्श देतात, विशेषतः व्रत-पूजेच्या दिवशी.
हळदी-कुंकू किंवा मांगलिक कार्यक्रमात साजेसा हा डिझाईन अधिक भरजरी आणि तपशीलवार असतो.
नुकत्याच लग्न झालेल्या स्त्रियांसाठी सुबक व साजेशी बेल डिझाईन श्रावण सणाच्या लूकला पूरक ठरते.
श्रावण महिन्यात भक्तिभाव जपणाऱ्या स्त्रियांसाठी राधा-कृष्ण, मोरपिसा व बासरीच्या आकृती असलेली मेहंदी डिझाईन खास असते.