Bigg Boss 19 Promo Saam Tv
मनोरंजन बातम्या

Bigg Boss 19: 'बिग बॉस'च्या घरात राडा, मालतीने फरहानाला लाथ मारली अन् टेबल..., पाहा VIDEO

Bigg Boss 19 Promo: बिग बॉसच्या घरात पुन्हा राडा झाला. फरहाना आणि मालती यांच्यात भांडण झाले. मालतीने फरहानाला लाथ मारली. त्यानंतर फरहानाना टेबल उलटा केला. या भांडणाचा प्रोमो व्हिडीओ समोर आला असून तो व्हायरल होत आहे.

Priya More

Summary -

  • बिग बॉस १९ च्या घरात मालती आणि फरहाना यांच्यात जोरदार राडा

  • मालतीने फरहाला लाथ मारली त्यानंतर दोघींमध्ये कडाक्याचे भांडण झाले

  • बिग बॉसचा हा प्रोमो व्हिडीओ व्हायरल होत आहे

  • फरहानाने प्रत्युत्तरादाखल टेबल उलटवून सामान खाली पाडले

'बिग बॉस १९' हा शो चांगलाच चर्चेत आले. या शोबाबत एकएक अपडेट जाणून घेण्यासाठी प्रेक्षक उत्सुक असतात. या शोची ट्रॉफी कोण जिंकणार? याची सर्वजण वाट पाहत आहेत. बिग बॉसचा हा सिझन खूपच वादग्रस्त ठरला. या सिझनमध्ये अनेकांची भांडणं पाहायला मिळाली. हा शो आता शेवटच्या टप्प्यात असून घरामध्ये उरलेल्या सदस्यांमध्ये अजूनही भांडणं होत आहे. बिग बॉसच्या घरात पुन्हा एकदा राडा झाला. मालती चाहरने फरहाना भट्टला लाथ मारली. त्यानंतर फरहानाने टेबल उलटा केला. या दोघींच्या वादाचा एक प्रोमो व्हिडीओ समोर आला आहे. जो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

नुकताच बिग बॉसच्या घरामध्ये 'टिकट टू फिनाले'चा टास्क पार पडला. या टास्कमध्ये गौरव खन्ना जिंकला आणि अंतिम फेरीत पोहणारा पहिला फायनलिस्ट ठरला. गौरव व्यतिरिक्त या टास्कमध्ये फरहाना भट्ट, प्रणित मोरे आणि अशनूर कौर हे देखील होते. टास्क हारल्यानंतर अशनूरने तान्या मित्तलला लाकडी फळी मारली. त्यामुळे घरात गोंधळ उडाला. आता बिग बॉसच्या घरात पुन्हा राडा झाला. मालती चाहरने फरहाना भट्टला लाथ मारली.

नुकताच बिग बॉसचा प्रोमो समोर आला त्यामध्ये असे दिसते की, फरहाना शहबाजकडे मालतीच्या टेबलावर पडलेल्या टिश्यूबद्दल तक्रार करते. मालतीने टिशूचा वापर करून ते तिथेच ठेवले असे ती म्हणते. तेवढ्यात मालती तिथे येते आणि फरहानाला टेबलवर ठेवलेले पाय काढायला सांगते. मला सामान घ्यायचे आहे तू पाय काढ असे ती म्हणते पण फरहाना पाय काढायला नकार देते तेव्हा मालती लाथ मारून तिचा पाय बाजूला करते. तेव्हा चिडलेली फरहाना टेबल उलटा करून त्यावर ठेवलेले मालतीचे सामान खाली पाडते.

यावेळी फरहाना म्हणते की, अशाप्रकारे लाथ मारशिल तर घरातून बाहेर काढेल. तेव्हा मालती म्हणते, 'जे रस्त्यावर राहतात ते तुझ्यापेक्षाही चांगले असतात. माहिती नाही तू इथे काय करत आहे.' फरहाना तिला म्हणते की, 'तू त्याच्यापेक्षा वाईट आहेस, हेच तुला आयुष्यात शिकली आहे मूर्ख.' यावेळी दोघांच्यामध्ये टोकाचे भांडण होते. यावरून असे दिसून येते की, 'विकेंड का वार'मध्ये सलमान खान या दोघींना चांगलाच ओरडा देण्याची शक्यता आहे. आता कोण घराबाहेर पडणार हे या आठवड्याच्या शेवटी समोर येईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raj-Uddhav Thackeray Alliance: सात नाहीतर ६ ठिकाणी बंधूंची युती, मुंबईसह 'या' महापालिकेच्या निवडणुका उद्धव ठाकरे अन् राज ठाकरे एकत्र लढणार

Maharashtra Live News Update: जिथे गाड्या फोडल्या, तिथेच पोलिसांनी काढली मावस भावांची "वरात

Pista Benefits: रोज सकाळी ५ पिस्ता खल्ल्याने होतील हे आरोग्यदायी फायदे

Googleवर शोधली कॉल गर्ल, नंतर हॉटेलवर बोलावून घेतलं अन्.. नेमकं घडलं काय?

Sunburn Festival: मुंबईत सनबर्न फेस्टिव्हल नकोच! सनातन संस्थेचा कडाडून विरोध

SCROLL FOR NEXT