Bigg Boss 19 Saam Tv
मनोरंजन बातम्या

Bigg Boss 19: बिग बॉसमध्ये 'या' स्पर्धकाच्या एन्ट्रीमुळे प्रेक्षक नाराज; दिला पहिलं एलिमिनेट करण्याचा सल्ला

Bigg Boss 19: 'बिग बॉस १९' सुरू झाल्यानंतर, आता १६ स्पर्धक घरावर राज्य करणार आहेत. ग्रँड प्रीमियर एपिसोड पाहिल्यानंतर लोकांनी काय प्रतिक्रिया दिल्या आहेत ते जाणून घेऊया

Shruti Vilas Kadam

Bigg Boss 19: 'बिग बॉस १९' सुरू झाला आहे. शोमध्ये एकामागून एक १६ स्पर्धकांनी घरात एन्ट्री केली आहे. नंतर ३ वाईल्ड कार्ड स्पर्धक एन्ट्री करणार आहेत. या सीझनमध्ये एकूण १९ सदस्य असतील. शोच्या पहिल्या एपिसोडवर वापरकर्त्यांनी काय प्रतिक्रिया दिल्या आहेत ते आता जाणून घेऊयात.

मृदुलवर प्रेक्षकांची नाराजी

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर, लोकांनी शाहबाज बदेशाबद्दल सर्वाधिक ट्विट केले आहेत. मृदुल तिवारी आणि शाहबाज यांच्यातील मतांच्या आधारे कोण घरात जाणार हे ठरवायचे होते. या घरात जाण्यासाठी अखेर मृदुलची निवड झाली. ही एकमेव गोष्ट आहे जी अनेकांना आवडली नाही. त्यांनी बिग बॉसच्या या निर्णयाविरुद्ध आवाज उठवणाऱ्या अनेक पोस्ट केल्या. तसेच त्याला सर्वांच्या आघी एलिमिनेट करण्याची विनंती करत आहेत.

प्रेक्षकांना बसीर, अशनूर आणि गौरव आवडले

पहिला एपिसोड पाहिल्यानंतर अनेकांनी त्यांच्या आवडत्या स्पर्धकांची नावे सांगितली आहेत. बहुतेक प्रेक्षकांना अशनूर, बशीर आणि गौरव खन्ना हे स्पर्धक फार आवडले आहेत. एका नेटकऱ्याने लिहिले, सध्या मला अशनूर, गौरव आणि बशीर अली हे स्पर्धक आवडले असून त्यातील कोणीतरी जिंकावे अशी माझी इच्छा आहे.

एका नेटकऱ्याने तर शोच्या टॉप २ स्पर्धकांची नावेही सांगितली आहेत. नेटकऱ्याच्या मते, गौरव खन्ना आणि अमाल मलिक शोमध्ये टॉपवर असतील. तर, आणखी एका नेटकऱ्याने लिहिले, मला वाटते की बसीर नक्कीच प्रेक्षकांचा आवडता स्पर्धक होईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : - पोलीस कर्मचाऱ्यावर काठीने हल्ला करणाऱ्या ४ जणांना अटक

Tuesday Horoscope : शत्रू वाढणार, विनाकारण मनस्ताप होणार; ५ राशींच्या लोकांना राहावे लागेल सावध

Election Commission: सात राज्यातील विधानसभेच्या ८ जागांसाठी होणार पोटनिवडणुका, जाणून संपूर्ण माहिती

PM Kisan Yojana: पीएम किसान योजनेचा २१वा हप्ता जमा झाला की नाही? असं करा स्टेप बाय स्टेप चेक

Swapna Shastra: चांगले दिवस येण्यापूर्वी स्वप्नात दिसू लागतात 'या' गोष्टी

SCROLL FOR NEXT