Pranit More-Abhishek Bajaj saam tv
मनोरंजन बातम्या

Pranit More-Abhishek Bajaj : "ही दोस्ती तुटायची नाय..."; प्रणित मोरे अन् अभिषेक बजाज पुन्हा एकत्र, पाहा VIDEO

Pranit More-Abhishek Bajaj Friendship Video : 'बिग बॉस 19'चे सदस्य प्रणित मोरे आणि अभिषेक बजाज यांच्यात एलिमिनेशनवरून वाद होतो आणि त्यांच्या मैत्रीत दुरावा येतो. मात्र नुकतेच दोन्ही मित्र एकत्र स्पॉट झाले आहेत.

Shreya Maskar

'बिग बॉस 19'चा दुसरा रन-रप प्रणित मोरे ठरला.

'बिग बॉस'च्या घरात प्रणित मोरे आणि अभिषेक बजाजमध्ये एलिमिनेशनवरून वाद झाला.

घराबाहेर येताच प्रणित मोरे आणि अभिषेक बजाज पुन्हा एकत्र पाहायला मिळाले.

'बिग बॉस 19' चा (Bigg Boss 19) विजेता गौरव खन्ना झाला. तर महाराष्ट्रीयन भाऊ प्रणित मोरे दुसरा रन-रप आला. 'बिग बॉस 19' चा गेम संपल्यावर नुकतेच 'बिग बॉस 19'च्या सदस्यांचे रियुनियन पार पडले. यात अनेक सदस्य पुन्हा एकत्र भेटले. अशात प्रणित मोरे आणि अभिषेक बजाज यांचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्याते दोघे एकत्र पाहायला मिळत आहे.

'बिग बॉस 19'च्या घरात असताना प्रणित मोरे आणि अभिषेक बजाज यांच्यात चांगली मैत्री झाली. मात्र पुढे टास्क दरम्यान प्रणितने घेतलेल्या एका निर्णयामुळे त्यांच्या मैत्रीत दुरावा आला. एका टास्कमध्ये प्रणितने अशनूरला सुरक्षित करून अभिषेकला नॉमिनेट केले. त्यामुळे अभिषेकला बिग बॉसचे घर सोडावे लागले. त्यामुळे अभिषेक प्रणित मोरेवर खूप नाराज होता. फिनालेला जेव्हा प्रणित बाहेर आला तेव्हा म्हणाला की, मी अभिषेकची समजूत काढेन. तो माझा मित्र आहे.

अशात आता प्रणित मोरे आणि अभिषेक बजाजला एकत्र स्पॉट करण्यात आले. त्यामुळे त्यांच्यातील भांडण मिटून पुन्हा मैत्री झाल्याचे पाहायला मिळाले. यामुळे त्यांच्या चाहत्यांना देखील खूप आनंद झाला आहे. दोघांनी एकमेकांना मिठी मारली आणि पापाराझींशी संवाद साधला. अभिषेक बजाज प्रणितला भाऊ बोलतो. दोघे एकमेकांशी हात मिळवतात आणि पोज देतात.

'बिग बॉस 19'च्या घरात प्रणित मोरे, अभिषेक बजाज आणि अशनूर कौर यांची मैत्री पाहायला मिळाली. प्रणित मोरेला जेव्हा डेंग्यू झाला होता. तेव्हा बिग बॉसच्या घरातून त्याला बाहेर जावे लागले. त्यावेळी अभिषेक बजाज आणि अशनूर कौरला खूप वाईट वाटले होते. अवघे घर प्रणित मोरेची आठवण काढताना दिसले. प्रणित मोरे स्टँडअप कॉमेडी, युट्यूबर, कंटेंट क्रिएशन करतो. प्रणित मोरेला महाराष्ट्रीयन भाऊ म्हणून ओळखले जाते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raj Thackeray: "स्वतःच्या अंगाशी आलं की ते राजकारण"; मिसिंग लिंकवरून राज ठाकरेंनी सरकारला सुनावलं

Maharashtra News Live Update: शेतकरी कर्जमाफसाठी शेतकऱ्यांंचं मंत्रालयाच्या बाजूला असलेल्या झाडावर चढून आंदोलन

Maharashtra Politics: मोठी बातमी! रायगडमध्ये भाजपच्या बड्या नेत्याविरोधात गुन्हा, राजकीय वर्तुळात खळबळ

Elephanta Caves : 'घारापुरी' लेणीला 'एलिफंटा' हे नाव कसं पडलं? कारण वाचून तुम्हीही व्हाल थक्क

उंची कमी असल्यास कपड्यांची निवड कशी करावी? जाणून घ्या 5 स्मार्ट स्टायलिंग टिप्स

SCROLL FOR NEXT