Bigg Boss 19 contestant SAAM TV
मनोरंजन बातम्या

नगमासोबतच शुभी जोशीला डेट? 'Bigg Boss 19'च्या स्पर्धकावर 'प्रेमात धोका' दिल्याचा आरोप, वाचा नेमकं प्रकरण काय?

Shubhi Joshi Expose Awez Darbar? : प्रसिद्ध अभिनेत्री शुभी जोशीने 'बिग बॉस 19'मधील एका स्पर्धकावर 'प्रेमात धोका' दिल्याचा आरोप केला आहे. नेमकं प्रकरण काय, सविस्तर जाणून घेऊयात.

Shreya Maskar

'बिग बॉस 19'च्या स्पर्धकावर 'प्रेमात धोका' दिल्याचा आरोप करण्यात आला आहे.

आवेज दरबार एकाच वेळी नगमा मिराजकर आणि शुभी जोशीला डेट करत असल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे.

आवेज दरबारने 'बिग बॉस 19'च्या घरात नगमा मिराजकरला प्रपोज केले.

सध्या सर्वत्र 'बिग बॉस 19'ची (Bigg Boss 19) चर्चा पाहायला मिळत आहे. बिग बॉसच्या घरात रोज नवीन खुलासे होत आहे. घरातील सदस्यांविषयी जाणून घेण्यासाठी प्रेक्षक देखील खूप उत्सुक आहेत. 'बिग बॉस 19'चा सदस्य आवेज दरबार (Awez Darbar) सध्या त्यांच्या लव्ह लाइफमुळे चांगला चर्चेत आहे. तो खूप वेळापासून नगमा मिराजकरला (Nagma Mirajkar) डेट करत आहे. 'बिग बॉस 19'च्या घरात आवेजने नगमाला प्रपोज देखील केला. मात्र आता अवेजच्या रिलेशनशिपबद्दल मोठा खुलासा करण्यात आला आहे.

'स्प्लिट्सव्हिला' फेम शुभी जोशीने ( Shubhi Joshi ) आवेजसोबत रिलेशनशिपमध्ये असल्याचा दावा केला आहे. शुभी जोशीने नुकत्याच एका मीडिया मुलाखतीत आपल्या लव्ह लाइफबद्दल सांगितले आहे. तिने सांगितल्यानुसार, शुभी जोशी 2024 मध्ये ऑगस्ट ते डिसेंबर दरम्यान आवेज दरबारसोबत रिलेशनशिपमध्ये होती. मॉडेलिंग इव्हेन्टमध्ये शुभी आणि आवेजची भेट झाली. मात्र ते तीन वर्षांपासून एकमेकांना ओळखत होते. शुभीने आवेजला 'तु कोणाला डेट करत आहे का?' असे देखील विचारले होते. मात्र तेव्हा आवेजने या गोष्टीला नकार दिला. त्याने सर्व खोटे असल्याचे सांगितले.

शुभी जोशीने अशीही माहिती दिली की, शुभीने रिलेशनशिपमध्ये येण्यास नकार दिला. मात्र तरीही आवेज तिच्याशी बोलायचा. तो मुंबईत होता आणि शुभी बंगळुरूमध्ये होती. अवेजने तिला कायम भावनिक आधार दिल्याचे शुभीने सांगितले. त्यांच्यात अनेक गोष्टींवर बोलने व्हायचे. हळूहळू ते दोघे एकमेकांना डेट करायला लागले. पण ते कमिटेड नव्हते. शुभी जोशीने आवेजवर फसवणुकीचे आरोप केले आहेत. कालांतराने आवेजने कामाचे कारण सांगून शुभी जोशीसोबत असलेले नाते तोडले.

शुभी जोशीने मुलाखतीत स्पष्टपणे आवेज दरबारचे नाव घेतले नाही. मात्र तिने सांगितलेल्या या गोष्टींवरून सोशल मीडियावर आवेज दरबार या नावाची चर्चा रंगली आहे. 'बिग बॉस 19'च्या घरात बसीर अलीने देखील आवेज दरबारला त्याच्या वैयक्तिक आयुष्यातील गोष्टी सर्वांना सांगेन अशी धमकी दिली होती. तसेच एकदा अमाल मलिक देखील आवेज एका वेळी अनेक मुलींना डेट करत असल्याचे बोला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vijay Deverakonda : "डोके दुखतंय..."; कार अपघातानंतर विजय देवरकोंडाची पहिली प्रतिक्रिया

सलमानला पोलिसांनी सिनेस्टाईल पकडलं; पनवेलमध्ये गुन्हा करून फरार, आरोपीचे कल्याणमध्ये मुसक्या आवळल्या

Maharashtra Live News Update : 'कुणबी'बाबत आज सुनावणी

Maharashtra Election : अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर, निवडणुकीची संभाव्य तारीख आली समोर, ३ टप्प्यांत होणार मतदान

Maharashtra Election : निवडणुकीचे पडघम; नगरपालिका, नगरपंचायतींच्या अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर, कोण मिळवणार सत्तेची खुर्ची?

SCROLL FOR NEXT