Bigg Boss 18  SAAM TV
मनोरंजन बातम्या

Bigg Boss 18 : करणवीर मेहराच्या हातातून गेली कॅप्टन्सी; विवियन डिसेना झाला 'टाइम गॉड'

Vivian Dsena : बिग बॉसने घराच्या नवीन 'टाइम गॉड'ची निवड केली आहे. 'टाइम गॉड'च्या शर्यतीत करणवीर मेहरा आणि विवियन डिसेना एकमेकांच्या विरोधात उभे होते.

Shreya Maskar

'बिग बॉस 18'चा (Bigg Boss 18 ) गेम दिवसेंदिवस रंगत जात आहे. प्रत्येक दिवशी नवीन एक राडा पाहायला मिळत आहे. या आठवड्यात टाईम गॉडसाठी विवियन डिसेना आणि करणवीर मेहरा यांच्यात स्पर्धा झाली. बिग बॉसच्या पहिल्या दिवसापासून विवियन आणि करणवीरमध्ये भांडण होताना पाहायला मिळत आहे.

टाईम गॉडच्या टास्क दरम्यान घराचे तांडव गड नावाच्या महाराज्यामध्ये रूपांतर होते. या टास्कमध्ये शिल्पा शिरोडकर राजमाता झालेली पाहायला मिळाली. तर विवियन (Vivian Dsena) आणि करणवीर मधील साम्राज्याचा उत्तराधिकारी शिल्पाला निवडायचा होता. म्हणजे शिल्पा शिरोडकर टाईम गॉडची निवड करणार होती. तेव्हा शिल्पा विवियनला विचारते की, "सिंहासन तुझ्याकडे गेले तर तू लोकांसाठी काय करणार?" यावर विवियन बोलतो की, "मी सर्वांना समान हक्क देईन." असे बोलून खेळाला सुरूवात होते.

खेळा दरम्यान करणवीरने (Karan veer Mehra) सांगितले की, "बिग बॉसमध्ये येण्यापूर्वी विवियनने माझी तब्येत विचारायला फोन केला होता. जेव्हा विवियन घरात सर्वांनसमोर बोला होता की, करणवीर माझा मित्र आहे. तेव्हा माझी छाती अभिमानाने फुलून गेली होती मात्र जेव्हापासून चाहतला त्यांनी विनाकारण त्रास दिला तेव्हा पासून तो माझ्या मनातून उतरला आहे."

या आठवड्यात सात सदस्य नॉमिनेट झाले आहेत. यात ईशा सिंह, श्रुतिका अर्जुन, शिल्पा शिरोडकर, ॲलिस कौशिक, अरफीन खान, शहजादा आणि अविनाश मिश्रा यांचा समावेश आहे. या आठवड्यात कोण घराच्या बाहेर जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. 'वीकेंड का वार' ची चाहत्यांना आतापासूनच उत्सुकता लागली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पुण्यात भाजपचा गड ढासळला; बड्या नेत्याचा पक्षाला रामराम, अजित पवारांच्या राष्ट्रवादीला देणार साथ

Makeup Tips: जुने मेकअप प्रॉडक्ट्स वापरताय? होऊ शकतं इन्फेक्शन, अशी घ्या काळजी

Crime: ४ वेळा 'दृश्यम' चित्रपट पाहिला, नंतर बायकोला संपवलं; मृतदेह भट्टीत जाळला अन्..., पुणे हादरले

Maharashtra Live News Update: धुळ्यात मंकीपॉक्सचा सहावा रुग्ण; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

Maharashtra Politics: पालघरमध्ये ठाकरे गटासह बविआला खिंडार; अनेक पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश

SCROLL FOR NEXT